Barshi News Saam Tv
महाराष्ट्र

Barshi News : आमदार राऊत यांच्यासह ६ जणांची निर्दोष मुक्तता; काय आहे १८ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

बार्शी : बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सहा जणांना जिल्हा सत्र न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. तालुक्यातील कुसळंब येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी कार्यकर्त्यांमध्ये झालेला वाद, दगडफेक प्रकरण आणि पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जात असताना झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात राऊत यांच्यासह सहा जणांविरोधात खटला सुरू होता. (Latest Marathi News)

बार्शी तालुक्याचे आमदार राऊत यांच्यासह सहा जणांची शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे. सी. जगदाळे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काय घडलं होतं?

जिल्हा सत्र न्यायालयानं आमदार राजेंद्र राऊत, विजय राऊत, सुधीर बारबोले, किरण तौर, चंद्रकांत पवार, राजा काकडे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. १९ एप्रिल २००४ रोजी बार्शी तालुक्यातल्या कुसळंब येथे ही घटना घडली होती. पांगरी पोलीस ठाण्यात शिरीष जाधव यांनी फिर्याद देताच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सबळ पुराव्याअभावी मुक्तता

तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक तांबडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादी, जखमी साक्षीदार, तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. सबळ पुरावा नसल्याचे संशयित आरोपींच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद मान्य करून न्यायालयाने राऊत यांच्यासह सहा जणांची निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपींच्या वतीने अॅड. सागर रोडे यांनी, तर सरकारतर्फे अॅड. कदम यांनी काम पाहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT