baramati  Saam tv
महाराष्ट्र

बारामतीत मोठा राडा; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला बाबासाहेबांचा फोटो डावलला; 'वंचित'कडून नगराध्यक्षांवर शाईफेक

baramati Republic Day Controversy : बारामतीत मोठा राडा झालाय. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला बाबासाहेबांचा फोटो डावलल्याने 'वंचित'कडून नगराध्यक्षांवर शाईफेक करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

बाबासाहेबांचा फोटो डावलल्याने वातावरण तापलं

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

बारामती नगराध्यक्षांच्या अंगावर शाईफेक

बारामतीत मोठा राडा झाला आहे. बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बारामतीमधील सुपा येथे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अंगावर शाईफेक करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरातल राजकीय वातावरण तापलं आहे.

देशभरात अनेक ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. देशातील विविध ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. बारामतीत काल पालिकेच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात आला नव्हता. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. या कार्यकर्त्यांनी थेट नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. तसेच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. या शाईफेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुरूम नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक

धाराशिव जिल्ह्यातील मुरूम नगरपरिषदेत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना देत असलेली संविधानाची प्रत असा फोटो किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा यापैकी कोणताही फोटो न लावता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आटोपला. यामुळे मुरूम शहरातील संविधानप्रेमी तरुणांनी मुरूम शहर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

तरुणांचा जमाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी दुपारनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे अभिवादन केले. परंतु त्या कार्यक्रमाला स्वतः मुख्याधिकारी गैरहजर होते. या प्रकारामुळे संविधानप्रेमी तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 27 जानेवारी मंगळवार रोजी मुख्याधिकारी भुजबळ यांना लेखी माफीनामा देण्यात यावा, अशी विचारणा तरुणांकडून करण्यात येत होती. परंतु दुसऱ्या दिवशी काही तरुणांनी मुख्याधिकारी भुजबळ यांच्यावर शाइफेक करत निषेध व्यक्त केलाय. तसेच मुख्याधिकारी भुजबळ यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘मुलुंडचा आमदार चोरीला गेला’; काँग्रेसचे राकेश शेट्टी यांची पोलिसांत तक्रार

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT