Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा, विधान परिषदेच्या निवडणुका, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

कात्रज घाटात एसटी बस-रिक्षा अपघात,रिक्षाचालकाचा मृत्यू

पुण्यात कात्रज बोगद्याजवळ गुरुवारी भीषण अपघात घडला.जुन्या कात्रज बोगद्याजवळ कात्रज घाटात एसटी बस आणि रिक्षा यांची जोरदार धडक होऊन रिक्षा पलटी झाली.या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

ठाण्यातील महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीतील ७३ कोटींचा कथित गैरव्यवहार

ठाण्यातील महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीतील ७३ कोटींच्या कथित गैरव्यवहाराची बाब समोर आली असून, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी उपलब्ध असलेला निधी अशा पद्धतीने गैरमार्गाने वापरला जाणे, हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. आम्ही याची तातडीने दखल घेतली असून, यावर लवकरात लवकर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या तत्कालीन आणि विद्यमान अधिकाऱ्यांना तत्काळ नोटीस बजावण्यात येत आहे. याशिवाय, घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधित कंत्राटदारांना तातडीने 'ब्लॅकलिस्ट'मध्ये टाकण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे जिल्हा नियोजन निधीतून कोणताही निधी वितरित करताना संबंधित पालकमंत्री आणि विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय किंवा रीतसर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय प्रशासकीय मान्यता देण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बारामती मध्ये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ५८ टक्के मतदान

उन्हाचा पारा कमी झाल्यानंतर मतदानाचा आकडा वाढला

दुपार पर्यंत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने बारामतीकर यांनी सायंकाळच्या सत्रात मतदानाला दिली पसंती

बारामती मध्ये ५८.२७ टक्के मतदान

दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

संध्याकाळी रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुमारे चार ते पाच पावसाची बरसात झाली. पावसा दरम्यान काही भागात जोरदार वारा सुटल्याने दक्षता म्हणून विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे दक्षिण रायगडमधील पोलादपुर, महाड आणि माणगावमधील जनजीवन विस्कळित झाले होते.

201 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी 6 ला आलेल्या आकडेवारी नुसार साधारणपणे 58.27 टक्के एवढे मतदान झाले

दक्षिण रायगडला अवकाळी पावसाने झोडपले

आज संध्याकाळी रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा चमचमाट आणि ढगांच्या गडगडाटासह सुमारे चार ते पाच पावसाची बरसात झाली. पावसा दरम्यान काही भागात जोरदार वारा सुटल्याने दक्षता म्हणून विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे दक्षिण रायगडमधील पोलादपुर, महाड आणि माणगावमधील जनजीवन विस्कळित झाले होते.

शिरूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अचानक हवामान बदलत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

पुण्यात कात्रज बोगद्याजवळ अपघात

  • जुन्या कात्रज बोगद्याजवळ घडला अपघात

  • अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

  • महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ रिक्षा पलटी होऊन घडला अपघात

  • पोलीस घटनास्थळी दाखल अधिक तपास करत आहेत

रायगडच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाची दमदार हजेरी

महाड तालुक्यासह शहरात देखील मुसळधार पावसाची बरसात

हवामान विभागाकडून कोकणाला पावसाचा इशारा

त्यानंतर आज अखेर रायगडच्या दक्षिण भागातील महाड परिसरात अवकाळी पाऊस कोसळला

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी रोहित पवारांचं ट्विट

आदरणीय पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत अनेक कार्यकर्त्यांनी काळजीपोटी फोन केले असून साहेबांची तब्येत उत्तम आहे. त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आल्याने ते मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे. एका कामासाठी माझंही नुकतंच त्यांच्याशी बोलणंही झालं असून त्यांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करु नये!

कॅनलमध्ये पडून शेतकरी बेपत्ता, औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील घटना

हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथे कॅनलच्या पाण्यात पडून शेतकरी वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

सोपान शेळके असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते शेताकडे जात असताना अचानक तोल जाऊन कॅनलमध्ये पडले असल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान सध्या येलदरी धरणातून शेतकऱ्यांच्या शेती पिकाला पाणी देण्यासाठी कॅनॉल मध्ये पाणी पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने बेपत्ता शेतकऱ्याला शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

लातूरमध्ये जनावरांच्या गोट्याला भीषण आग, सात जनावरांसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक

  • लातूरच्या चाकूर तालुक्यातील जानवळ शिवारात जनावरांच्या गोट्याला भीषण आग लागली

  • या आगीत शेतकरी ज्ञानोबा भोजने यांचे लाखोचे नुकसान झालं आहे

  • तर गोठ्यातील एकूण सात जनावरे, जळून मृत्युमुखी पडली आहेत, त्याच बरोबर सोयाबीन शेतमालासह इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालेत

वसईच्या नायगाव सनटेक मॅक्सवर्ल्ड बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाला कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण

  • सनटेक मॅक्सवर्ल्ड बिल्डिंगच्या परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये घटनेचा सर्व प्रकार कैद झाला आहे

  • बिल्डिंगच्या सुरक्षारक्षकाने आरोपींना दारू आणि सिगरेट पिण्यास मनाई केल्याच्या कारणास्तव मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • आरोपींनी सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली आहे. आरोपी विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

  • तर मारहाण प्रकरणातील आरोपींचा नायगाव पोलिसांकडून शोध सुरू आहे.

भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी...

भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी...

संगमनेर न्यायालयात आज केलं होत हजर..

मंत्र तंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू झालाय गजाआड..

पाच दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा कोर्टात केलं होतं हजर ...

संगमनेर कोर्टाने पुन्हा चार दिवसांची दिली पोलीस कोठडी

sangamner : भोंदू राजेंद्र गडगे कोर्टात हजर, आज पोलिस कोठडी संपली 

संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात केलं हजर...

पाच दिवसाची पोलिस कोठडी आज संपणार...

संगमनेर कोर्टात गडगेला केलं हजर...

दत्तधाम सरकार नावाने भोंदू चालवत होता दरबार...

मंत्र तंत्राने दुर्धर आजार बरे करण्याचा भोंदू गडगेचा दावा...

अंनिसच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल...

पाच दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा केले कोर्टात हजर...

आणखी पोलीस कोठडी मिळणार? कि न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष

रत्नागिरी अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला 

रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाचा सह अवकाळी पाऊस

तुरळ इथं मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी

मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली

हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा

कोकणासाठी आज हवामान विभागांना दिला होता अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट

दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात

गेल्या अर्ध्या तासापासून बरं असतात पावसाच्या दमदार सरी

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

पुणे-सातारा महामार्गावरील चेलाडी पुलाखालील अतिक्रमणांवर NHAI कडून धडक कारवाई

चेलाडी पुलाखाली अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.. प्रशासनाने या हातगाडी आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई करून पुलाखालचा संपूर्ण परिसर रिकामा केला.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरल मेगाब्लॉक संपला

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर चार तासाचा मेगाब्लॉक. मिसिंग लीगच्या तिथे पुलाला सेटर आणि पेंटिंग साठी ठेवला होता द्रुतगती महामार्ग बंद. अकरा ते तीन वाजेपर्यंत ठेवला होता हा बंद. मात्र तीन वाजता हा ब्लॉग चालू करण्यात आलेला आहे. सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे.

महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्रांक व्यवसायाला फटका, स्टॅम्प मिळत नसल्यानं शासकीय कामे रखडली

जुनी पेन्शन नव्यानं लागू करण्याच्या मागणी सह इतर मागण्यासाठी राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यानी संप पुकारलाय. या संपाचे परिणाम दिसायला सुरूवात झाली. वाशिम महसूल विभागाच्या कर्मचारी गेल्या 3 दिवसांपासून संपावर गेल्याने विविध सरकारी,बँक,शिक्षण कामाकरिता लागणारे मुद्रांक मिळत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुणे - सातारा महामार्गावरील चेलाडी पुलाखालील अतिक्रमणांवर कारवाई

पुणे - सातारा महामार्गावरील चेलाडी पुलाखालील अतिक्रमणांवर एनएचएआयकडून धडक कारवाई करण्यात आलीय. चेलाडी पुलाखाली अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता.. प्रशासनाने या हातगाडी आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई करून पुलाखालचा संपूर्ण परिसर रिकामा केला..

chhatrapati sambhaji nagar : शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर द्वारसभा घेत घोषणाबाजी

kalyan : कल्याणमध्ये फर्निचर शोरूममध्ये अजगर शिरल्याने खळबळ

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात एका फर्निचरच्या शोरूममध्ये भलामोठा अजगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शोरूममधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

gunratna sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन 

गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसेचा विरोध

मनसे कार्यकर्त्यांची गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी

nandurbar : नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर वाढला

नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर वाढल्याने प्रशासन सतर्क...

नंदुरबार जिल्ह्यात 18 ठिकाणी उष्णता कक्ष तयार...

उष्णतेमुळे तातडीने उपचार मिळावा यासाठी अत्याधुनिक उष्माघात कक्षाची निर्मिती...

मे महिन्यात तापमानाचा पारा आणखीन वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली...

अवैध वाळू उपसा,अवैध धंदे विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन

नाशिकच्या बागलाणमधील ता-हाबाद येथील प्रतिष्ठित शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब महाजन यांच्यावर काही वाळूमाफियांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. महाजन यांनी अवैध वाळू उपसा आणि अवैध धंद्याविरोधात आवाज उठवल्याने त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आल्याने आज ग्रामसथांनी सटाणा-पिंपळनेर मार्गावरील ता-हाबाद येथे गाव बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन केला. यावेळी हल्ला करणा-यांना पोलिसांनी तातडीने अटक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या रस्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक अनेक काळ ठप्प झाली होती.

Baramati : बारामती पोटनिवडणुकीत दुपारी १ पर्यंत ३१.९१ टक्के मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक..

दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के मतदान

Govandi : गोवंडीत उभ्या असलेल्या वाहनात सीएनजी स्फोट

गोवंडीत उभ्या असलेल्या वाहनात सीएनजी स्फोट झालाय

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर सीएनजी सिलिंडरचा स्फोट

अग्निशमन दलाच्या जवान घटनास्थळी

thane : ठाणे रेल्वे स्टेशनजवळ शिवशाही बसला लागली आग 

ठाणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलावर परिवहन सेवेच्या शिवशाही बसला आग लागली. बसला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Baramati: बारामतीच्या तानाईनगरमध्ये गुलाबी मतदान केंद्राची निर्मिती

बारामती मधील तानाईनगर परिसरात गुलाबी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर प्रथमोपचार ,पिण्याचे पाणी, जेष्ठ नागरिकांसाठी विश्रांती, हिरकणी कक्ष, पाळणाघर या सुविधा निर्माण करण्यात आल्यात. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हा आगळावेगळा प्रयत्न केला गेलाय. विशेष म्हणजे हे संपूर्ण पिंक मतदान केंद्र महिला चालवत आहेत

Chhatrapati Sambhaji Nagar: शासकीय कर्मचारी संघटनेचा संपाचा तिसरा दिवस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळं जिल्हाअधिकारी कार्यालयातील प्रशासनाचे कामकाज ठप्प झाले आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५ विभागांतील सुमारे १६ हजार शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांची कामे खोळंबली आहेत. आज संपाच्या तिसऱ्या दिवशी सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर द्वारसभा घेतली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात एकूण १ हजार १२ पैकी तब्बल ८३६ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे.

Sangli: सांगलीत काँग्रेसच्या वतीने रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन..

रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी सांगलीमध्ये काँग्रेस नगरसेवकांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले आहे. शामरावनगर येथे गेल्या दीड वर्षांपासून गटारीचे काम सुरू असल्याने,मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे..यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना दुखापत होत आहे.त्यामुळे पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.सुमारे तासभर हा रास्ता रोको सुरू होता, दरम्यान शहर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मार्ग मोकळा केला.

Washim: वाशिममध्ये कल्याणकारी मंडळातर्फे भांडे घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

वाशिमच्या अनसिंग इथ कामगार कल्याणकारी मंडळातर्फे भांडे वाटप केल्या जात असल्याच्या .माहिती वरून भांडे घेण्यासाठी जिल्ह्याभरातील नागरिकांची सकाळपासून मोठी गर्दी केली होती.भर उन्हात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल हाल झाल्याचं बघायला मिळालं...

Nanded: नांदेडमध्ये काँग्रेसच्या विरोधात महिलांनी केले जन आक्रोश आंदोलन

महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी भाजप सरकारने संसदेत नारीशक्ती वंदन बिल आणलं होत. परंतु या नारीशक्ती वंदन बिलाला विरोधकांनी विरोध केला. आणि संसदेत हे बिल पारित झालं नाही. यानंतर काँग्रेस विरोधात भाजपाने आंदोलने सुरू केली आहेत. नांदेड मध्ये आज काँग्रेस विरोधात महिलांनी जन आक्रोश आंदोलन केले. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी काँग्रेस विरोधात आणि राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Ashok Kharat: पाचव्या गुन्ह्यात अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी

पाचव्या गुन्ह्यात अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी

सहाव्या गुन्ह्याच्या तपासासाठी अशोक खरात याला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीकडून न्यायालयाला देण्यात आले पत्र

अशोक खरात याची रवानगी नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात होईल

वैद्यकीय तपासणीनंतर एसआयटी पुन्हा अशोक खरात याला सहाव्या गुन्ह्यात ताब्यात घेणार

उद्या अशोक खरात याला पुन्हा सहाव्या गुन्ह्याच्या संदर्भात न्यायालयात हजर करण्यात येईल

West Bengal: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. आज १५२ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होणार आहे. यामध्येचे आता आम जनत उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायू कबीर आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. मुर्शिदाबादमध्ये दगडफेक करण्यात आली आहे.

Solapur: सोलापुरातील बालमाता प्रकरणांची महिला बालहक्क आयोगापुढे आज होणार सुनावणी

सोलापुरातील बालमाता प्रकरणांची राज्य महिला बालहक्क आयोगाने घेतली गंभीर दखल

बालमाता प्रकरणांची महिला बालहक्क आयोगाकडे आज होणार महत्त्वपूर्ण सुनावणी

संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश

महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या 84 पैकी 34 माता अल्पवयीन असल्याचे निष्पन्न

धक्कादायक म्हणजे सोलापूर महापालिकेकडून तब्बल 15 प्रकरणांची माहिती पोलिसांना कळविण्यात आले नसल्याचे समोर

सदरच्या विषयामध्ये आत्तापर्यंत विविध पोलीस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल तर आणखी गुन्हे वाढण्याची दाट शक्यता

Rahuri By Election: राहुरी विधानसभेत सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान

राहुरी विधानसभा _

सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत 18.22 टक्के मतदान.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील शिरूर कुकडेल परिसरात दोन बिबट्यांची दहशत

नंदुरबार जिल्ह्यातील शिरूर कुकडेल परिसरात दोन बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतकरी मृत्यूच्या छायेत वावरत आहेत. गेल्या आठवड्यापासून बिबट्यांचे दर्शन होत असूनही वनविभागाने ना पिंजरा लावला, ना कॅमेरे. पिके कापणीला आली असताना मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. अधिकारी येतात आणि फक्त पाहणी करून जातात, असा आरोप शेतकरी हेमकांत पाटील यांनी केला आहे. नरभक्षक होण्यापूर्वीच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे...

Baramati: बारामती पोटनिवडणुकीसाठी ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक -२०२६

सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59 टक्के मतदान

पुणे रेल्वे स्टेशनची खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून पाहणी

पुणे रेल्वे स्टेशनची खासदार मेधा कुलकर्णी पाहणी करत आहेत

रेल्वे स्टेशन परिसरातील अस्वच्छता,सुरक्षाव्यवस्था पाहणी करत आहेत

पुणे रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

पंढरपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याला मारहाण

माढा तालुक्यात अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यास गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपनिरीक्षक व अंमलदारास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

ढाब्यावर अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक अमित नागरे व अंमलदार युवराज टिळे यांना मिळाली होती.

त्यानुसार कारवाई करायला गेल्यानंतर ढाब्याचे मालक प्रमोद गोरे पाटील यांनी अधिकाऱ्यांबरोबर वाद घालून आपले नातेवाईक आणि मित्रांना बोलून गोंधळ घातला.

त्यानंतर प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण केली. याप्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक कॉम्रेड प्रशांत आंबी यांना रात्री फोन करून धमकी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणावरून प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती

नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार, तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय

- नाशिकरोडमध्ये धक्कादायक प्रकार, तक्रार न घेतल्याच्या रागातून युवकाचा टोकाचा निर्णय

- उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न

- विषारी औषध सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न

- भांडण आणि विनयभंग प्रकरणावरून वाद वाढला

- पोलिसांनी आधीच युवकावर गुन्हा दाखल केला होता

पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा; मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्या विरोधात घोषणाबाजी

Baramati Election : बारामतीमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ८ टक्के मतदान

बारामती मध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत अवघे ८ टक्के मतदान

बारामती विधानाभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणूक

दुपारनंतर मतदानाचा आकडा वाढणार का याकडे लक्ष

सकाळी ९ पर्यंत बारामती मध्ये ८.१ टक्के मतदा

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत; कर्डेलवाडीत गोठ्यातील कुत्र्यावर हल्ला

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरतोय.

कर्डेलवाडी येथे शेतकरी रेवणनाथ कर्डिले यांच्या गोठ्यातील कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.

घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरतेय.

ठाण्यात कपड्याच्या दुकानात चोरी

ठाण्यातील चरई परिसरात रात्रीच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानात चोरी

घटनेचा सीसीटीव्ह व्हिडिओ आला समोर

ठाण्यातील चरई परिसरात मध्य रात्री चोरा ने एक दुकावर डल्ला मारला आहे

नौपाडा पोलिसांचा माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे

Thane: ठाण्यातील चरई परिसरात रात्रीच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानात चोरी

ठाण्यातील चरई परिसरात रात्रीच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानात चोरी

घटनेचा सीसीटीव्ह व्हिडिओ आला समोर

ठाण्यातील चरई परिसरात मध्य रात्री चोरा ने एक दुकावर डल्ला मारला

रात्री दुकान बंद असताना लोखंडी रॉड ने दुकानाचा शटर तोडून चोरट्याने दुकानात शिरला आणि अख्खा दुकान साफ करून टाकला आहे

नौपाडा पोलिसांचा माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे...

Baramati: दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे -

दादांना जाऊन ३ महिने सुद्धा झाले नाहीत

आज आम्ही कर्तव्य बजावण्यासाठी आलो आहोत

दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं

मोठ्या संख्येने लोकांनी मतदान करावं

Baramati: सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवार यांच्या आईची भेट

बारामती -

सुप्रिया सुळे काटेवाडीमध्ये दाखल

सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवार यांची आई आशा काकी यांची भेट

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुप्रिया सुळे थेट काटेवाडी मध्ये पोहोचल्या

Nagpur: ढाबे-हॉटेलमध्ये अवैध दारूपुरवठ्यावर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशनद्वारे मोठी कारवाई

नागपूर -

- ढाबे-हॉटेलमध्ये अवैध दारूपुरवठ्यावर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशनद्वारे मोठी कारवाई

- ३० अधिकारी, १०० पोलिसांचा सहभाग आरसीपी प्लाटूनसह संयुक्त कारवाई

- ढाबे, हॉटेल, लॉजवर अचानक धाडी, अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा फोकस

- दारूबंदी कायद्यान्वये २० प्रकरणे नोंदवत एकूण १००हून अधिक कारवाया

- परवानगीशिवाय मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई,।वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांनाही दणका

- १२ ढाबे-रेस्टॉरंटवर विशेष कारवाई, गुप्त साठा ठेवून विक्री करणाऱ्यांवर गुन्हे

- एनडीपीएस कायद्यान्वये २ प्रकरणे नोंदवत अमली पदार्थांवरही पोलिसांची नजर

- ७२ गुन्हेगारांची झाडाझडती, तडीपार आणि रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी

- अश्लील वर्तन करणाऱ्यांवरही विरोधात गुन्हे

- २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तनावर पोलिसांचा धडक

- परिमंडळ ४ चे उपायुक्त रश्मिता राव यांचे मार्गदर्शन, संपूर्ण परिसरात एकाचवेळी मोहीम

Nagpur: वर्धा रोडवरील चिचभुवन परिसरात मिरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग

नागपूर -

- वर्धा रोडवरील चिचभुवन परिसरात मिरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला आग

- भारत पेट्रोलियम पंपाजवळ कंटेनर उभा असताना आग लागल्यान मोठा धोका निर्माण

- क्षणात धूर आणि ज्वाळांनी भीषण रूप, परिसरात वाहतुकीची वर्दळ परिस्थिती गंभीर होत असतानाच

- बेलतरोडी पोलिसांची तात्काळ धाव, आणि नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले, तसेच अग्निशाम विभागाचा प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला.

- वाहतूक वळवून मोठा अनर्थ टाळला, अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण

Nagpur: हायकोर्टाची दिशाभूल केल्यामुळे 81 याचिकाकर्त्यांवर एकूण चार लाख रुपयांचा दंड

नागपूर -

- हायकोर्टाची दिशाभूल केल्यामुळे 81 याचिकाकर्त्यांवर एकूण चार लाख रुपयांचा दंड

- जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील वडोधा- इस्लामपूर उपसा सिंचन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती.

- शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरत असलेल्या या प्रकल्पाकरिता 6 जुलै 1999 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निर्धारित किमतीमध्ये जमिनी खरेदी करण्यात आली.

- यामध्ये याचिकाकर्त्यांनी समानतेच्या आधारावर वाढीव भरपाई मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती

- यापूर्वी काही शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देण्यात आली आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता

Baramati: लोक मतदानाच्या माध्यमातून दादांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करत आहेत - श्रीनिवास पवार

श्रीनिवास पवार -

लोक मतदानाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत आहेत दादांच्या प्रती

प्रत्येकाच्या आपापली मतं आहेत, कुठल्या पक्षांनी उमेदवार उभे केलेले नाहीत वैयक्तिक सर्वांनी फॉर्म भरलेले आहे.

बारामतीकरांना मी हेच आवाहन करेल की त्यांना माहिती अजितदादांनी त्यांच्यासाठी काय केले ते त्यामुळे त्यांना आवाहन करीन दादांना श्रद्धांजली म्हणून मतदानाला या.

आत्ताच बोलणं योग्य ठरणार नाही परंतु जे काही अचानक घडला आहे त्यामुळे बारामतीकर शॉक मध्ये आहेत. मतदारांना वाटते की आपण शेवटचं दादांना श्रद्धांजली द्यावी.

Dharashiv: धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये येत्या जूनपासून पहिली ते पाचवीपर्यंत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार

धाराशिव -

धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये येत्या जून पासून पहिली ते पाचवीपर्यंत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार

घसरत चाललेली शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न

या बाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय एकमताने मंजूर करण्यात आला ठराव

धाराशिव जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक इंग्रजी भाषा शिकवणारे शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांकडून घेतले संमती पत्र

Nashik: TCS प्रकरणात पीडितेचा धक्कादायक जबाब, आरोपी रात्री उशिरा व्हॉट्सॲपवर करत होता अश्लील मेसेज

नाशिक -

- TCS प्रकरणात पीडितेचा धक्कादायक जबाब

- कंपनीत नेटचे पासवर्डही अश्लील भाषेत, दररोज बदलले जायचे पासवर्ड, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

- चौथ्या पीडितेचा जबाब SIT आणि महिला आयोगासमोर नोंद

- वरिष्ठांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष, छळ अधिक वाढल्याचा दावा

- आरोपींकडून अफवा पसरवून मानसिक छळ केल्याचा आरोप

- आरोपी रात्री उशिरा व्हॉट्सॲपवर करत होता अश्लील मेसेज

- कामावरून काढण्याची धमकी देत छळ

Baramati: सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क

रणजीत पवार आणि त्यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क

सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांनी सुद्धा बजावला मतदानाचा हक्क

सुप्रिया सुळे यांनी केलं मतदान

Nashik: सप्तशृंगगडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे २२ किलो चांदीची तफावत समोर आल्याने उडाली मोठी खळबळ

नाशिक -

- सप्तशृंगगडावरील मंदिराच्या नक्षीकामात सुमारे २२ किलो चांदीची तफावत समोर आल्याने मोठी खळबळ

- २२ किलो चांदीचा अपहार झाल्याचा संशय

- विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

- चांदीच्या जुन्या नोंदीनुसार सुमारे ४०६ किलो चांदी असणे आवश्यक , प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी

- सुमारे २२ किलो ४९० ग्रॅम चांदी गायब असल्याचे समोर

- १५ सप्टेंबर २०२१ ला दिवसा चांदी काढण्याचा झाला होता निर्णय

- मात्र दुसऱ्या दिवशी रात्रीच्या वेळी मूल्यमापकच्या अनुपस्थितीत चांदी उतरवल्याची माहिती

- या प्रकरणी ट्रस्टच्या कारभारावर संशय, मोठ्या अपहाराची शक्यता

Nashik: भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

नाशिक -

- भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार

- पाचव्या गुन्ह्यात आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपत असल्यानं कोर्टात हजर करणार

- महिला लैंगिक शोषणाच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला पुन्हा पोलीस कोठडी मागणी केली जाण्याची शक्यता

- भोंदू अशोक खरात विरोधात सुरू असलेल्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे SIT च्या हाती

- कोर्टाच्या आजच्या सुनावणी आणि निर्णयाकडे लक्ष

Baramati: सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावलं

बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावलं

श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांनी देखील केलं मतदान

Pune: पुण्यातील 23 गावाच्या बांधकाम परवानगीचा तिढा सोडण्यासाठी आज महत्त्वाची बैठक

पुणे

समाविष्ट 23 गावाच्या बांधकाम परवानगीचा तिढा सोडण्यासाठी आज महत्त्वाची बैठक

पुणे महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीएचे आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार

पीएमआरडी कडून महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील बांधकाम परवानगी प्रलंबित आहेत

प्रलंबित प्रकरणे आणि हस्तांतरणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे

तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजित दादा पवार यांनी पी एम आर डी कडून बांधकाम परवानगी चे आदेश महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचे आदेश दिले होते

दोन महिन्यानंतरही या परवानगी प्रलंबित राहिल्याने यासंदर्भात आज महत्त्वाची बैठक होणार आहे

Baramati: काटेवाडीत श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांनी केलं मतदान

बारामती -

काटेवाडीत श्रीनिवास पवार, शर्मिला पवार यांनी केलं मतदान

मतदान केल्यानंतर शर्मिला पवार आणि सुनेत्रा पवार या एकमेकींना आलिंगन देत भेटल्या

शर्मिला पवार, श्रीनिवास पवार यांनीही जय पवारांची भेट घेतली

Baramati: खासदार सुप्रिया सुळे बजावणार मतदानाचा हक्क

बारामती -

खासदार सुप्रिया सुळे बजावणार मतदानाचा हक्क

बारामती येथील रिमांड होम केंद्रावर करणार मतदान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना पाठिंबा

Ahilyanagar: राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अक्षय कर्डिलेंनी केलं मतदान

अहिल्यानगर -

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.

महाविकास आघाडीचे गोविंद मोकाटे विरुद्ध महायुतीचे अक्षय कर्डिले असे सरळ लढत होत आहे

शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्यास माध्यमातून आपल्याला जनता निवडून दिला असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे

Baramati: बारामती पोटनिवडणूक, सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार

अजित पवारांच्या निधनानंतर बारातमीत पोटनिवडणूक

सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा अधिकार

सुनेत्रा पवार यांनी भावनिक वातावरणात केलं मतदान

बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन

मतदानावेळी बोलताना सुनेत्रा पवार भावुक

कElection: बारामती आणि राहुरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान

बारामती आणि राहुरी पोट निवडणुकीसाठी आज मतदान

सकाळी ८ वाजता मतदानाला होणार सुरूवात

बारामतीत सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात

राहुरीत अक्षय कर्डिले निवडणूक लढवत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीत हनी ट्रॅप; शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 69 लाख

Vijay Thalapathy: मुख्यमंत्र्यांनी विश्वास जिंकला, थलपती विजय यांना १४४ आमदारांनी केलं मतदान, कोणता पक्ष फुटला?

Kalyan : 'लुडो'चा वाद टोकाला गेला, रागाच्या भरात मामाने भाच्याचा काटा काढला; कल्याणमधील खळबळजनक घटना

Crime News: भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ

Gold Limit Rules in India: तुम्ही घरात किती सोनं ठेवू शकता? वाचा नियम काय सांगतात

SCROLL FOR NEXT