Political Tug of War in Baramati: Will Thackeray Back Congress or Sunetra Pawar? 
महाराष्ट्र

By-Election: बारामती-राहुरी पोटनिवडणुकीत 'मविआ'चा धर्म की राष्ट्रवादीला साथ? उद्धव ठाकरे काय करणार?

Baramati By-Election: बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारी बाबत चर्चा करत आहे.

Bharat Jadhav

बारामती आणि राहुरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला आहे. मात्र काँग्रेसने उमेदवार देण्याच्या भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेना कोंडीत सापडली आहे. ठाकरे गट कोणासोबत जाणार त्यांची भूमिका काय असणार हे उद्या कळणार आहे.

उद्धव ठाकरे आपला निर्णय घेतली अशी चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनंतीचा मान ठेवत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यायचा? असा सवाल त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार देण्याबाबत काँग्रेसमधील राज्यातील नेत्यांनी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांशी फारशी चर्चा केली नाहीये.

चर्चा न करता काँग्रेसने भूमिका जाहीर केली त्यानंतर पक्षांशी चर्चा करत आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली, अशी चर्चा आहे. सुनेत्रा पवार काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोमवारी ६ एप्रिलला महायुतीच्या उमेदवार म्हणून त्या अर्ज भरतील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह महायुतीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. या फोनद्वारे त्यांनी बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरेंकडे पाठिंबा मागितला. मात्र ठाकरेसेनेनं अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

SCROLL FOR NEXT