Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाने रुग्णांची लूट; बारामतीतील धक्कादायक प्रकार

Baramati News : गोरगरिबांना मोठ्या आजारांवर उपचार घेता यावे यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेंतर्गत रुग्णालयात रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले

मंगेश कचरे

बारामती : सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारांवर मोफत उपचार मिळवून देण्यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेच्या नावाखाली रुग्णांची लूट केली जात असल्याचा प्रकार बारामतीमध्ये समोर आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान रुग्णांची होत असलेल्या फसवणुकीबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे रुग्णांनी फसवणूक करत असलेल्या बारामती हॉस्पिटल प्रा.लि. विरोधात तक्रार दिली आहे.

गोरगरिबांना मोठ्या आजारांवर उपचार घेता यावे यासाठी शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेंतर्गत अनेक रुग्णालयात रुग्णांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार बारामतीत देखील समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार सुरू असतानाही बारामती हॉस्पिटलने विविध तपासण्यांच्या आणि नॉन मेडिकल साहित्याच्या नावाखाली २१ हजार ९० रुपये घेतले असल्याने तक्रार आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार 

बारामतीत महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत दाखल रुग्णांकडून बारामती हॉस्पिटल प्रा. लि. हे बेकायदेशीररित्या पैसे घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या बाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे किसन गोपाळ मत्रे या रुग्णाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात २१ हजार ९० रुपयांचे बिल वेगवेगळ्या तपासणी व मेडिकल साहित्याच्या नावाने घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता पुणे जिल्हाधिकारी नेमकी कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागलं आहे.

रुग्णालयातील डॉक्टराचे उडवाउडवीचे उत्तर 
दरम्यान या संदर्भात महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पुणे जिल्ह्याच्या प्रमुख डॉ. प्रीती लोखंडे यांच्याकडे विचारणा केली असता तक्रार प्राप्त झाली असून ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बारामती हॉस्पिटलच्या डॉ. नरुटे यांच्यासोबत साम प्रतिनिधींने संपर्क साधला असता पैसे घेतले नसल्याचे सुरवातीला सांगितले. पुन्हा म्हणाले घेतले असतील तर माहित नाही! का घेतले ते रुग्णालयालाच विचारा आम्ही त्याचा जीव वाचवलाय; असं म्हणत उडवा उडवीची उत्तरे दिले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT