Baramati Accident Saam tv
महाराष्ट्र

Baramati Accident : बारामतीत भीषण अपघात, डंपरने बारावीच्या विद्यार्थ्याला चिरडले

Baramati News : बारामती तालुक्यातील तांदूळवाडी गावतील जुनेद झारी असं अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तांदुळवाडी- बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर हा अपघात झाला

मंगेश कचरे

बारामती : परीक्षा सुरु असल्याने पेपर आटोपल्यानंतर दुपारी दोघे मित्र दुचाकीने घरी जात होते. याच दरम्यान तांदूळवाडी- बारामती मार्गावरील वळण रस्त्यावर एका चार चाकी हायवा डंपरने दुचाकीला धडक देत विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला दुसरा जखमी झाला आहे. 

बारामती तालुक्यातील तांदूळवाडी गावतील जुनेद झारी असं अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तांदुळवाडी- बारामती मार्गावर रेल्वे गेट बोगद्या शेजारच्या वळणावर हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. जुनेद झारी हा बारामती येथील टीसी कॉलेजमध्ये बारावीच्या वर्गात शिकत होता. बारामतीमधील टी सी कॉलेजमधील पेपर संपल्यानंतर जुनेद झारी व त्याचा मित्र तुषार सोबत दुचाकीवरून घरी निघाला होता. 

वळण रस्त्यावर झाला अपघात 

दरम्यान जुनेद झारी हा दुचाकी चालवत होता. तर मित्र तुषार पाठीमागे बसला होता. यावेळी दुचाकीवरून दोघे निघाले असताना वळण रस्त्यावर अचानक पुढून आलेल्या डंपर चालकाने आपली गाडी वळवली. यामुळे घाबरलेल्या दुचाकी वरील दोघेही जमिनीवर कोसळले. यावेळी डंपरचे पुढील चाक जुनेद झारी याच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला मित्र थोडक्यात बचावला आहे.  

सीसीटीव्हीत घटना कैद 

तांदुळवाडी- बारामती रस्त्यावर झालेला हा थरारक अपघात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर दुचाईवर मागे बसलेला तुषार हा डंपर चालकाकडे गेला. यावेळी चालक खाली उतरल्यानंतर त्याने कोणतीही चौकशी न करता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असून तुषार हा त्याचा पाठलाग करण्यासाठी धावत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम?

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT