बारामती : बारामतीमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु असून वीर धरण भरले आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग होत असून नीरा नदीवर इंदापूरातील गिरवीत टाकण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या भराव्याला पुन्हा एकदा भगदाड पडले आहे. तिसऱ्यांदा हे भगदाड पडले असून गिरवी वरुन गणेशगाव मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बारामती (Baramati) जिल्ह्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने सध्या वीर धरणातून नीरा नदी (Nira River) पात्रात गेल्या काही दिवसापासून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी निरा नदीला पूरजन्य परिस्थिती असून इंदापूर तालुक्यातील गिरवी येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलंय. नीरा नदीवरील गिरवी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भरावा या पुराच्या पाण्याने फुटल्याने पाणी बंधाऱ्याच्या बाजूने वाहू लागले आहे.
गिरवीतील या बंधाऱ्याला भगदाड पडण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. बंधाऱयाला भगदाड पडण्याची आता तिसरी वेळ आहे. भगदाड पडल्याने इंदापूर तालुक्यातील गिरवी गावातून माळशिरस तालुक्यातील गणेशगाव कडे होणारी वाहतूक बंद पडली आहे. आता नदीला असलेला पूर ओसरल्यानंतरच बंधाऱ्याला पडलेले भगदाड भरण्याचे काम होऊ शकणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.