Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Baramati News : बारामती शहरातील बारामती- भिगवन रस्त्यावर सोसायटीजवळ अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.

मंगेश कचरे

बारामती : विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. निकालाची अजून प्रतीक्षा असताना उत्साही कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा बॅनर लावले जात आहेत. दरम्यान बारामतीमध्ये तर अजित पवार यांचे लवकरच मुख्यमंत्री महोदय असे अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत.  

विधानसभा निवडणुकीसाठी नुकताच मतदान झाले आहेत. यानंतर आता उद्या (२३ नोव्हेंबर) मतमोजणी होणार असून दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी उत्साही कार्यकर्ते हे आपल्या नेत्याचे शुभेच्छांचे बॅनर ठिकठिकाणी लावत असल्याचे दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे बारामतीमध्ये (Baramati News) देखील हे चित्र पाहण्यास मिळत असून अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत. 

बारामती शहरातील बारामती- भिगवन रस्त्यावर सोसायटीजवळ (Ajit Pawar) अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे. या फलकामध्ये मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्षी शपथ घेतो की.. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून.. असा उल्लेख या फलकावर लावण्यात आलेला आहे. नदीम शेख मित्रपरिवार यांनी हा फलक बारामती भिगवन रस्त्यावर लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Maharashtra News Live Update: मालेगावच्या रमजान पुरा भागात ATS च्या पथकाचा छापा...

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

SCROLL FOR NEXT