Baramati News Saam tv
महाराष्ट्र

Baramati News : बारामती हादरले.. दोन अल्पवयीन मुलींवर चौघांकडून अत्याचार; तिघे पोलिसांच्या ताब्यात

Baramati News : १४ सप्टेंबरला बारामतीमधील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिसात दाखल झाल्या होत्या

मंगेश कचरे

बारामती : बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींना पुण्याच्या हडपसर परिसरात एका खोलीवर नेत दारू पाजली. यानंतर त्या दोघी मुलींवर चौघांनी मिळून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.

बारामतीमधील (Baramati) दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिसात १४ सप्टेंबरला दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही मुली वेगवेगळ्या शाळांमध्ये असून दोन्ही मैत्रिणी आहेत. त्या १४ सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता निघून जात बसने पुण्यात पोहोचल्या. दरम्यान त्यांनी जाताना ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुली पाठोपाठ ज्ञानेश्वर बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना (Crime News) नेत रात्री त्यांना दारु पाजून चौघांनी आळीपाळीने अत्याचार केले.

दरम्यान यातील एका मुलीने हडपसरहून आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली असता तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिसासह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. १६ तारखेला मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना दारु पाजून चौघांनी अत्याचार केल्याची माहिती मुलींनी दिली. त्यानुसार बारामती पोलिसांनी ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे, यश उर्फ सोन्या आटोळे यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  तर चौथा आरोपी अद्याप फरार असुन त्याचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT