Ajit pawar Accident  Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Accident Video : अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणारा नवीन व्हिडिओ समोर, पाहा Video

Ajit Pawar Plane Crash New Video : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विमान जळाल्यानंतर स्फोट होताना पाहायला मिळतो आहे.

Alisha Khedekar

  • अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू

  • अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू

  • अपघाताचा नवीन व्हिडिओ समोर

अक्षय बडवे, पुणे

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन ते कोसळले होते. या अपघातामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर अनेक तर्क वितर्क लावले जात असताना आता नवीन व्हिडिओ समोर आला आहे.

बारामती तालुक्यातील गोजुबाई येथे २८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने गावकऱ्यांसह आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांतच त्याला भीषण आग लागली होती. ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी या घटनेनंतर व्हिडिओ काढले. यादरम्यान एका तरुणाने काढलेल्या व्हिडिओमध्ये विमानाला आग लागल्यांनंतर स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसत आहे. स्फोटानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रशासन, पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला व आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या नव्या व्हिडिओमुळे पोलिसांच्या तपासाला नवं मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तसेच हा अपघात होता की घातपात हे देखील उघडकीस येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT