bara balutedar sanghatna morcha in malegaon nashik  saam tv
महाराष्ट्र

Bara Balutedar Sanghatna Morcha : विद्युत पुरवठा कंपनी विराेधात मालेगावमध्ये बारा बलुतेदार संघटनेचा मोर्चा

हा माेर्चा विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकला. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी अन्यथा कंपनी विरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात एका खाजगी कंपनीला शहराचा विद्युत पुरवठ्याचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीच्या कारभारा विरोधात आज (मंगळवार) बारा बलुतेदार संघटनेच्या वतीने मोर्चा (bara balutedar sanghatna morcha) काढण्यात आला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कंपनीने तालुक्यातील खडकी येथील नितीन दादाजी पवार हा लाईनमन नसताना त्याला पोलवर काम करण्यास सांगितल्यानंतर अन्य कर्मचा-यांच्या चुकीमुळे त्याचा अपघात होऊन त्याला दोन्ही हात गमवावे लागले. एवढे होऊन ही कंपनीने त्याला कुठलीही ठोस भरपाई न दिल्याने त्याच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली.

त्यानंतर बाराबलूतेदार संघटनेचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी त्याच्या कुटुंबियास मदतीचा हात दिला. दरम्यान कंपनीने त्याला व त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेकडोंच्या संख्येने बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यमातून आज मोर्चा काढला. (Maharashtra News)

हा माेर्चा विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकला. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी अन्यथा कंपनी विरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा बंडूकाका बच्छाव यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT