घुबड  saam tv
महाराष्ट्र

Banda Village: सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं घुबडांचं अनोखं गाव, पाहा व्हिडिओ

Inside India’s Owl Paradise: घुबड हा शब्द ऐकला तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो...घुबडाबद्दल अनेकांचे गैरसमज आहेत...मात्र, असं एक गाव आहे त्या गावात तुम्हाला सगळीकडे घुबडच दिसतील...कोणतं आहे ते गाव...चला जाऊया घुबडांच्या गावात...

Bharat Mohalkar

एका बाजूला तेरेखोल नदी तर दुसर्‍या बाजूला सह्याद्रीचा पश्चिमघाट आणि त्यामध्ये वसलेलं निसर्गसंपन्न आणि जैवविविधता लाभलेल बांदा गाव. या बांदा गावावा आता नवी ओळख मिळालीये... बांदा आता घुबडांचे गाव म्हणून ओळखलं जाणार आहे...कारण घुबडांच्या तब्बल आठ दुर्मिळ प्रजाती या गावात आढळतात.

केवळ घुबडच नव्हे तर गेल्या वर्षभरात बांदा परिसरात 175 हुन अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजातींचा शोध लागला आहे, . बांदा परिसरात देवराईंचं विशेष संवर्धन केल्यानं दुर्मिळ पक्षांच्या अनेक प्रजाती या भागात स्थिरावल्या आहेत. स्थलांतरित पक्षी देखील याच परिसराला पसंती देतात..आरोसबाग, सटमटवाडी, शेर्ले हा ग्रामीण भाग पक्षी निरीक्षणासाठी नवा हॉटस्पॉट ठरतोय..

मात्र एकीकडे गाव बर्ड वॉक साठी प्रसिध्दीस येत असताना गावाच्या आसपास मायनिंगसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनी भविष्यात यांच्या अधिवासाला धोका ठरण्याची भीती व्यक्त होतेय. भविष्यातली ही भीती प्रत्यक्षात येऊ नये आणि आपल्या या गावाची घुबडांची ओळख कायम राहावी म्हणून गावातील तरुणांही पर्यावरण रक्षणासाठी हिरीरीनं सहभाग घेत आहेत. सध्यातरी बांदा गाव कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि पक्षी निरिक्षकांसाठी पर्वणी ठरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगे एकटेच मुंबईला येणार, परवानगी नाकारल्यानं जरांगेंचा गनिमीकावा?

दिशा सालियन प्रकरणात गुन्हा दाखल; मुख्य आरोपींमध्ये आदित्य ठाकरेंचं नाव

Car Insurance : कार इन्शुरन्स क्लेम होऊ शकतो रद्द; चुकूनही करू नका या १० चुका

उद्धव ठाकरे पुढच्या वर्षी मुख्यमंत्री होणार! बड्या नेत्याच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात

SCROLL FOR NEXT