पर्यटनाला बंदी तरीही पर्यटक नाणेघाट, माळशेज, भिमाशंकर परिसरात रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

पर्यटनाला बंदी तरीही पर्यटक नाणेघाट, माळशेज, भिमाशंकर परिसरात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला बंदी घालण्यात आली असली तरी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नाणेघाट भिमाशंकर परिसरात मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

रोहिदास गाडगे

भिमाशंकर : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पांढऱ्या शुभ्र धुक्यात हिरवागार निसर्ग पयर्टकांना भुरळ घालतो! मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाला बंदी घालण्यात आली असली तरी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनबंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नाणेघाट भिमाशंकर परिसरात चिमुकल्यांसह, महिला, तरुण व तरुणी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत.

हे देखील पहा -

भिमाशंकर आणि जुन्नर तालुक्यातील माळशेज, नाणेघाट परिसरात मागील पंधरा दिवसांपासून निसर्गाचे नयनरम्य रुप पहायला मिळत आहे. पावसाच्या सरीसोबत पांढरेशुभ्र धुके, खळखळ वाहणारे धबधबे असे निसर्गाचे देखणे आणि मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. तरीही, पुणे मुंबई परिसरातुन असंख्य पर्यटक चिमुकल्यांसह महिला, तरुण-तरुणी भिमाशंकर, नाणेघाट, माळशेज परिसरात दाखल होत आहे 

मागील दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे घरातच असलेली चिमुकली मुलं, महिला व तरुणवर्ग नयनरम्य निसर्गात आनंद साजरा करत आहेत. प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली हि बंदी उठवावी आणि या सार्‍या विलोभनीय दृश्यांचा अनुभव पर्यटकांना घेता यावा अशी मागणी आता पर्यटक करू लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोईसरमध्ये ४० वर्षीय इसमाची हत्या; ओसवाल एम्पायरमध्ये रक्तरंजित घटना

Nashik: नाशिकमध्ये पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न|VIDEO

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा २५,१०० रुपयांनी स्वस्त; 18k- 22k आणि 18k चे दर किती?

Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने आयुष्य संपवलं, वयाच्या ३०व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT