Diwali Festival 2022, Fire Crackers, Ulhasnagar saam tv
महाराष्ट्र

Diwali Festival 2022 : 'या' फटाक्यांच्या विक्रीवर बंदी; जाणून घ्या डेसिबलची मर्यादा

महापालिका आणि पोलिसांना लवकरच त्याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.

अजय दुधाणे

Diwali Festival : उल्हासनगरात (ulhasnagar) दिवाळीपूर्वी (diwali) फटाक्यांनी 'आवाजाची परीक्षा' दिली. कोणत्या फटाक्याचा आवाज किती डेसिबल आहे हे मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये २२ प्रकारच्या फटाक्यांचा समावेश हाेता. (ulhasnagar latest marathi news)

दिवाळीपूर्वी शहरात फटाक्यांच्या बाजारपेठा सजल्या असून दरवर्षीप्रमाणे यंदाही १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या २२ प्रकारच्या फटाक्यांची नुकतीच एमपीसीबीकडून उल्हासनगरच्या सेंच्युरी मैदानात चाचणी करण्यात आली. (Maharashtra News)

यात एक हजार, पाच हजारांच्या माळा, सुतळी बॉम्ब, आकाशात जाऊन फुटणारे फटाके फोडून त्यांची डेसिबल मीटरवर चाचणी घेण्यात आली. याबाबतचा अहवाल तयार करून तो महापालिका आणि पोलिसांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जास्त आवाजाच्या फटाक्यांची विक्री करण्यावर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात येतील अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी दिली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या अण्णामलाईंचं तिकीट कापलं? तामिळनाडू विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी आली समोर

Maharashtra Live News Update : अकोल्यात खळबळ! उच्चभ्रू वस्तीत सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय, पोलिसांनी केला पर्दाफाश

Mini Cylinder: गॅस सिलेंडर घेणं झालं सोपं! अ‍ॅड्रेस प्रूफची गरज नाही, परत केल्यावर मिळणार रिफंड

Congress: मोठी बातमी! बारामती, राहुरीची पोटनिवडणूक काँग्रेस लढणार, हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; लक्ष्मण हाकेंची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की, VIDEO

SCROLL FOR NEXT