Nagpur Balloon Cylinder Explosion Saam TV
महाराष्ट्र

Balloon Cylinder Explosion: फुगा खरेदीचा हट्ट जीवावर बेतला, सिलिंडरच्या स्फोटात ४ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Nagpur Balloon Cylinder Blast: नागपूर शहरातील बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रविवारी रात्री फुग्यांच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

Satish Daud

Nagpur Balloon Cylinder Explosion

राज्यात एकीकडे ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असताना दुसरीकडे नागपुरात एक भयानक घटना घडली. बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रविवारी रात्री फुग्यांच्या सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात एका चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) असे सिलिंडर स्फोटात (Cylinder Explosion) मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर फरिया हबीब शेख (वय २८) आणि अनमता हबीब शेख (वय २४) असे जखमी महिलांची नावे आहेत.

या घटनेनंतर फुगेविक्रेता फरार झाला असून पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळच्या मैदानावर नेहमीच लोकांची गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी फुगे विक्रेते येत असतात.

क्रिसमसच्या सुट्ट्या असल्याने सिझान रविवारी रात्री आपल्या मावशीसोबत मैदानावर फिरण्यासाठी गेला होता. फारिया व अनमता सिझानच्या मावशी आहेत. दरम्यान मैदानावर रात्री ८.३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता.

फुगेवाल्याला बघताच सिझानने फुगा खरेदीचा मावशीकडे हट्ट धरला. दरम्यान, फुगेवाल्याच्या बाजूला तिघेही उभे असताना अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की सिलिंडर उंच हवेत उडाला. आग लागल्याने सिझान गंभीर जखमी झाला फरिया व अनमता यांनाही सिलिडर लागल्यामुळे दुखापत झाली.

परिसरातील नागरिकांनी तिघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी सिझानला मृत घोषित केलं. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या फुगेवाला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

310 कोटींचा तोटा… एसटी तिकीट महागणार? महायुती सरकारने दिले संकेत|VIDEO

'त्याने सर्व निकष पूर्ण केलेत...'; १५ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात स्थान द्या, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT