Balasaheb Thorat, Eknath Shinde, Karnataka Maharashtra Border Row saam tv
महाराष्ट्र

Karnataka Maharashtra Border Row : 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री शिंदे मूग गिळून गप्प' (पाहा व्हिडिओ)

मुख्यमंत्र्यांनी धाेरण स्पष्ट केले पाहिजे.

Siddharth Latkar

Karnataka Maharashtra Border Dispute : सीमावादाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलं आहे. दाेन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सबुरीची भुमिका घेतली असली तर महाराष्ट्र सरकार काेणाच्या तरी दबावाखाली आहे असा आराेप विराेधक करीत आहेत. आज काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थाेरात यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. (Maharashtra News)

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) म्हणाले सीमेवर मराठी बांधवांवर होणारा हल्ला चिंताजनक आहे. महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नाही. आत्तापर्यंत सर्व पक्ष जेव्हा जेव्हा सीमेवर वाद होते तेव्हा एकत्र यायचे, पण आता भाजप सरकारमध्ये आहे.

जेव्हा कर्नाटकचे मुख्यमंत्री सुप्रीम कोर्टाची केस संदर्भात वकिलांशी चर्चा करत होते तेव्हा आपले मुख्यमंत्री गुवाहटीला पर्यटन करत होते. मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर गंभीर आहेत का? असा सवाल थाेरात यांनी केला आहे.

थाेरात म्हणाले मला वाटते त्यांना केंद्र सरकारकडून सूचना मिळतात, त्यानूसार ते वागत आहेत. खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून वाद मिटवण्यासाठी नियोजन करावे असे आवाहन देखील थाेरात यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्पचा फुगा अमेरिकेनंच फोडला; इराण बलशाली अमेरिकी अधिकाऱ्यांचीच कबुली

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

SCROLL FOR NEXT