thakare gat  saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray: नाशकात बाळासाहेब अवतरणार? ठाकरीशैलीत काय बोलणार? नाशकात हायटेक सभा?VIDEO

Nashik News: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच हे वाक्य आता पुन्हा ऐकू येणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या निर्धार शिबिरात आता चक्क बाळासाहेब ठाकरे आपल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुखांचा आवाज आता शिवसेनेच्या व्यासपीठावरूनच पुन्हा ऐकू येईल. पण शिवसेनेच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे कसे अवतरणार? हे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई बाहेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पहिलंच निर्धार शिबिर होणार आहे. मात्र या शिबिरात चक्का ठाकरे गटाच्या व्यासपीठावर खुद्द बाळासाहेब ठाकरे अवतरणार आहेत. होय...तुम्ही बरोबर ऐकताय...खुद्द बाळासाहेब आपल्या ठाकरी शैलीत शिबिरातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणार आहेत. या कार्यशाळेत अनेक नवीन प्रयोग होणार आहे. त्यामुळे या कार्यशाळेबाबत पक्षाबरोबरच सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.. मात्र बाळासाहेब भाषण कसं करणार ? त्यासाठी ठाकरे गटानं काय तयारी केलीये पाहूया

नाशकात ठाकरेंचं हायटेक शिबिर -

नाशिकच्या गोविंदनगरमधील मनोहर गार्डन लॉन्सवर शिबिर

ठाकरेंच्या सेनेकडून पहिल्यांदाच AI तंत्राचा वापर

AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेबांचं भाषण

भाषण आक्रमक आणि ठाकरी शैलीतील असणार

आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन,उद्धव ठाकरेंकडून समारोप

शिबिरात ठाकरे गटाचे नेते,वकील असीम सरोदेंचं मार्गदर्शन

कोल्हापुरात होणारं ठाकरे गटाचं शिबिर रद्द झालं. मात्र आता त्यानंतर नाशकात ठाकरेंनी जोर लावलाय. नाशकात होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून मरगळलेल्या ठाकरे गटात पुन्हा जोश भऱण्याचा प्रयत्न या शिबिरातून होणार आहे. त्यातच हे शिबिर हायटेक होणार असल्यानं शिवसेना ठाकरे गट शिबिराच्या माध्यमांतून कात टाकणार का? आणि त्यातही एआयच्या माध्यमांतून आक्रमक शैलीत बाळासाहेब भाषणातून कोणाला झोडपणार याकडे लक्ष लागलंय..मात्र याचा राजकीय फायदा किती होणार हे काळचं ठरवेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT