Eknath Shinde's first reaction to Shaina NC tearing Balasaheb Thackeray's photo saam tv
महाराष्ट्र

शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde On Shaina NC: शायना एनसी यांच्याकडून पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले शिंदे? जाणून घ्या.

Bharat Jadhav

सोनिया गांधी लिखित 'बिलॉन्गिंग- अ जर्नी ऑफ लव्ह' हे पुस्तकावर बंदी घालावी, असं म्हणत शिंदे गट शिवसेनेच्या नेत्यांनी या पुस्तकाच्या काही प्रतीचे पाने फाडली. मात्र यावेळी शिंदे गट शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाटला. यावरून ठाकरे गटाकडून शायना एनसींसह शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. आता शायना एनसींच्या या कृतीवर उपमुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय.

बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवतच आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात आदरच आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे राजकारण करणाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नाही. शायना एनसींकडून चुकीने फोटो फाटला. त्यानंतर लागलीच त्यांनी स्पष्टीकरण दिलं असं एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान आज शिवसेनेने मुंबईत ही पत्रकार परिषद सोनिया गांधी यांच्या पुस्तकाविरोधात रान उठवण्यासाठी घेतली होती. मात्र शायना एनसी यांच्या एका कृतीने शिंदे गटालाच टीकेचं धनी व्हावे लागलं. ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली. शिवसेनेलाच शायना एनसी यांच्या बचावात्मक पवित्र्यात जावे लागले. या सगळ्या प्रकारानंतर शायना एनसी यांना आता एकनाथ शिंदे यांनी तातडीने बोलावून घेतलं होतं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानभवनात बोलावून घेतलं होतं. शायना एनसी यांच्याकडून पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला होता. आता एकनाथ शिंदे हे शायना एनसी यांना काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं होतं. शायना एनसींसोबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोर्शी नगरपरिषदेतील 'ओल्या पार्टी' प्रकरणी मोठी कारवाई

ICC ODI Ranking : वनडे रँकिंगच्या टॉप १० मध्ये मोठी उलथापालथ; रोहित शर्मालाही जोरदार दणका

राँग साईडने गाडी चालवणं पडलं महागात! मुंबईत तब्बल ३८ हजार चालकांवर कारवाई, थेट गुन्हे दाखल; वाचा सविस्तर

Vastu Tips : पर्समध्ये या ३ गोष्टी ठेवताय? सावधान! आर्थिक संकटाला मिळू शकतं निमंत्रण

हिवाळ्यात खजूर खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT