Bajri Price yandex
महाराष्ट्र

Bajri Price: थंडीच्या तडाखा वाढल्याने बाजरीच्या किंमतीत वाढ, हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यदायी

Bajari Price: हिवाळ्यात बाजरीची खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बाजरीची भाकरी खाल्ल्याने पोटाशी किंवा पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात.

Dhanshri Shintre

जिल्ह्यात वातावरणात चांगलेच बदल झाले असून थंडीत वाढ होत असताना बाजारात धान्याच्या दरांवरही परिणाम होत आहे. यात बाजरीच्या दरात कमालीची वाढ झाली असून, बाजार समितीत बाजरीला व्यापाऱ्यांनी 2 हजार 700 ते 3 हजार रुपये प्रतिक्विंटल दर देत शेतकऱ्यांकडून खरेदी केली.

दुसरीकडे किरकोळ बाजारातही बाजरी 35 आणि 40 रुपये प्रतिकिलो या दरात उपलब्ध आहे. येत्या काळात या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यात बाजरी खाणे आरोग्यदायी मानले जाते. यातून बाजरीला मागणी वाढते. यंदाही ही स्थिती निर्माण झाली असून, बाजारात दिवाळीपासूनच बाजरीचे दर वाढल्याचे सातत्याने समोर येत आहे.

गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. बाजरीचे दर गव्हापेक्षा अधिक असल्यामुळे चपातीपेक्षा भाकरीचे दर अधिक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे सांधेदुखी, सर्दी व अन्य आजार डोके वर काढतात. त्यामुळे पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.

जिल्ह्यातील विविध भागात यंदा बाजरीचे उत्पादन कमी झाल्यानेही दरात वाढ झाल्याची माहिती आहे. सद्यः स्थितीत बाजारात तुरळक आवक आहे. जिल्ह्यात यंदा मोजक्याच भागात बाजरीचे उत्पादन आहे. बहुतांश शेतकरी घरापुरते बाजरीचे उत्पादन घेतात. यामुळे मागणी तेवढा पुरवठा नसल्याची माहिती व्यापारी देत आहेत. येत्या काळात आवक वाढल्यास दर कमी होण्याची शक्यताही व्यापारीकडून सांगण्यात येत आहे.

गव्हाचे दर किती?

बाजारात अनेक प्रकारचा गहू विक्रीसाठी उपलब्ध असून, ४० ते ४५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.

बाजरीचे दर किती?

बाजरी ५० ते ६० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. गव्हापेक्षा बाजरीचे दर अधिक आहेत. त्यामुळे चपातीपेक्षा भाकरी महाग आहे.

गतवर्षी ३० ते ४० रुपये किलो दराने बाजरी विक्री सुरु होती. यावर्षी ५० ते ६० रुपये दराने विक्री सुरु असून, तब्बल २० रुपयांनी दर वाढले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT