Sambhaji Bhide, Mla Yashomati Thakur, Amravati, Police Investigating saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide News : आमदार यशाेमती ठाकूरांना जीवे मारण्याची धमकी देणा-यास जामीन मंजूर, भिडेंच्या समर्थकाने पाेलिसांना सांगितले कारण (पाहा व्हिडिओ)

Sambhaji Bhide Controversial Statement : महापुरुषांबाबत संभाजी भिडेंचे वक्तव्य वादग्रस्त असल्याचे म्हणणे काॅंग्रेस आमदार यशाेमती ठाकूर यांनी म्हटलं हाेते.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Yashomati Thakur : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shiv pratishthan hindustan chief sambhaji bhide) यांच्या समर्थकास आमदार यशाेमती ठाकूर यांना समाज माध्यमातून धमकी दिल्याप्रकरणी कैलास सूर्यवंशी (kailas suryavanshi) यास पाेलिसांनी ताब्यात घेतले हाेते. चाैकशीअंती सूर्यवंशी याचा जबाब घेत त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. (Maharashtra News)

संभाजी भिडे यांच्यावर काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी टीका केल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील कैलास सूर्यवंशी या युवकाने यशोमती ठाकूर यांना समाज माध्यमातून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी कैलास सूर्यवंशीला यवतमाळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. कैलास हा संभाजी भिडे यांचा कट्टर समर्थक असल्याने त्याने रागाच्या भरात धमकी दिल्याचे पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले.

आता पश्चाताप हाेत आहे...

मला याचा पश्चाताप होत असल्याचे कैैलासने पाेलिसांना सांगितले अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान चौकशी नंतर त्याला एसीपी कार्यालयातून जामिनावर सोडून देण्यात आले आहे. संशियत कैला सूर्यवंशी हा वकिलीचे शिक्षण घेत असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

SCROLL FOR NEXT