नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था; प्रशासाचं मात्र दुर्लक्ष... दिनू गावित
महाराष्ट्र

नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची दुरावस्था; प्रशासाचं मात्र दुर्लक्ष...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार: महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 ब (शेवाळी ते नेत्रग) च्या नंदुरबार जिल्हा हद्दीतील नंदुरबार ते तळोदा दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. सध्या या रस्त्यावर वाहतूक करणारे मालवाहक वाहने तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्याचप्रमाणे नंदुरबारहुन अक्कलकुवा तळोदा आणि धडगाव या तालुक्यांमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील या रस्त्याचा वापर करत असतात. सध्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (Bad condition of road between Nandurbar to Taloda; But the administration ignored)

हे देखील पहा -

या मार्गावरून रोज अधिकारी व पदाधिकारी ये-जा करत असतात. तरीदेखील या महामार्गाच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच रोज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून अधिकारी व पदाधिकारी यांच्याविषयी संतापाची भावना उमटताना दिसत आहे.

रोज या मार्गावर लहान-मोठे अपघात होत असताना कोणी याकडे लक्ष का देत नाही? हा एक न उलगडणारा प्रश्नच आहे. भविष्यात या महामार्गामुळे त्रासलेल्या लोकांकडून मोठे आंदोलन होऊ शकते यात तिळमात्र शंका नाही. म्हणून प्रशासनाने आपली तत्परता दाखवून सदरील महामार्गाची दुरुस्ती करावी ही मागणी जोर धरू लागली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT