Bachchu Kadu News Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu News : बच्चू कडूंना २ वर्षांची शिक्षा; नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

Latest Nashik News : आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा

अभिजीत सोनावणे

Nashik Bachchu Kadu News : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणि आणि अधिकाऱ्यासोबत गैरवर्तणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. (Latest Marathi News)

2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. यावेळी बच्चू कडू (Bachchu Kadu) तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले होते. तसेच शिवीगाळ केली होती. या प्रकरणी बच्चू कडू यांना आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

2017 साली नाशिक (Nashik) महापालिकेवर प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बच्चू कडू यांचा संयम सुटला आणि ते आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अंगावर धावून गेले. त्यांनी आयुक्तांना शिवीगाळ करत त्यांच्यावर हात उगारल्याचा दावा केला जातो.

यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांना संरक्षण देत आमदार बच्चू कडू यांना बाजूला केले होते. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही घबराट पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT