Amravati Assembly Election 2024 google
महाराष्ट्र

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Amravati Assembly Election 2024: राज्यातील २८८ विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. सुरुवातीचे कल पाहता महायुतीला राज्यात मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील २८८ विधानसभा निवडणुकांचे निकाल आता हाती येत आहेत. सुरुवातीचे कल पाहता महायुतीला राज्यात मोठं यश मिळताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिसरी आघाडी उघडलेल्या बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून लढत होते.

बच्चू कडू यांनी संभाजी छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्याशी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीने आपले उमेदवारही दिले आहेत. त्यामुळे या आघाडीचा काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बच्चू कडू यांनी १९९९ साली विधानसभेची पहिली निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. त्यावेळी त्यांचा १३०० मतांनी पराभव झाला होता.

अमरावती जिल्ह्यातील अमरावती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके या विजयी झाल्या आहेत. या जागेवर राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके या आधीच आमदार आहेत. यावेळी काँग्रेसने येथे आघाडी घेतली. अमरावतीतून राष्ट्रवादीने सुलभा खोडके यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने डॉ. सुनील देशमुख यांना तिकीट दिले होते. अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता हेही रिंगणात होते. (Amravati Assembly Election 2024)

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुलबा खोडके या अमरावती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात होत्या. त्यांच्यासमोर सुनील देशमुख भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. सुलभा खोडके यांना एकूण ८२५८२ मते मिळाली होती, तर भाजपाच्या तिकीटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे आणि त्याच जागेवरुन दोनदा आमदार राहिलेले सुनील देशमुख यांना ६४३१३ मतांवर समाधान मानावे लागले. सुलभा खोडके यांनी सुनील देशमुख यांचा १८२६९ मतांनी पराभव केला.

महाराष्ट्राचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

SCROLL FOR NEXT