Bachchu Kadu  Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics News : २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर कुणीही विचार केला नसेल, ते महाराष्ट्राच्या राजकारणात घडले. भाजपला एकटं पाडत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले. मविआच्या या सरकारमध्ये प्रहारचे बच्चू कडू यांचाही वाटा होता. ठाकरेंनी बच्चू कडू यांना मंत्रीपद दिलं. पण अवघ्या अडीच वर्षात हे सरकार कोसळलं. शिवसेनेत फूट पडली, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष आमदारांना सोबत घेत उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली खेचलं. एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यावेळी त्यांना बच्चू कडू यांना पाठिंबा दिला. मागील दोन वर्षांपासून बच्चू कडू यांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यांनी आपल्या मनातील खदखद अनेकदा बोलून दाखवली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतला. पण त्याआधीच त्यांना सर्वात मोठा धक्का बसलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांच्या एकमेव आमदाराला पळवलं. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांची अवस्था अडकित्त्यात सापडलेल्या सुपारी सारखी झाली आहे.

बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सपोर्ट केला होता. उद्धव ठाकरेंना देखील 'कडू' सल्ले दिले होते. पण बच्चू कडू यांना हा बंड परवडला नाही. कारण, पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रि‍पदाने हुलकावणी दिलीच, पण आता एकमेव आमदारही सोडून गेलाय.

कोणत्याही क्षणी राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होऊ शकतात. प्रत्येक राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटनाही यात मागे नाही. बच्चू कडू यांनी एक पाऊल पुढे टाकत तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेतलाय. छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत बैठकही झाली. एकीकडे विधानसभेची तयारी सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार धक्का दिलाय. एकमेव आमदार राजकुमार पटेल हे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांची अवस्था बिकट होण्याची शक्यता आहे. राजकुमार पटेल यांच्या मतदारसंघात आता बच्चू कडू कोणाला संधी देणार? याची चाचपणी सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

SCROLL FOR NEXT