Mla Bacchu Kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu News: बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी मान्य करावे अन्यथा...; बच्चू कडू यांचा इशारा

Bacchu Kadu News: राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे.

Vishal Gangurde

अमर घटारे

Amravati News: राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेतल्याचा आरोप होत आहे. तर बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेल्यांनी मान्य करावे अन्यथा त्यांच्यावर फौजदार कारवाई केल्या जाईल, असा इशारा आमदार व दिव्यांग कल्याण अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

बदली प्रक्रियेतून सूट मिळावी यासाठी अनेक शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र व बनावट घटस्फोटाचे दाखले दिल्याचा आरोप प्रहार शिक्षक संघटनेचे महेश ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे आता तपासणी झाल्यास अनेक शिक्षकांचे बिंग फुटणार आहे.

अमरावती जिल्ह्यासह यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला या जिल्ह्यात जवळपास २५०० शिक्षक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर सर्वांची चौकशी करून दोषी शिक्षकावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील 412 शिक्षकांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकल बोर्डाकडे प्रमाणपत्र तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी दिली.

मेडिकल बोर्डाकडून प्रमाणपत्र बनावट आढळल्यास शिक्षकांवर गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती सुद्धा शिक्षणाधिकारी यांनी दिली.

येत्या तीन ते चार महिन्यात दिव्यांग मंत्रालयामार्फत हे बनावट कर्मचारी शोधण्यासाठी अभियान राबवले जाणार आहे. ज्या शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेतला असेल. त्यांनी मान्य करावे अन्यथा त्यांच्यावर फौजदार कारवाई केल्या जाईल. तसेच त्यांना नोकरीतून काढण्यात येईल, अशी तंबी आमदार व दिव्यांग कल्याण अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

Railway Recruitment: परीक्षा नाही थेट रेल्वेत नोकरी; ५३४९ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT