Eknath shinde News  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप; तब्बल १०-१५ आमदारांचा होणार शिंदे गटात प्रवेश?

आगामी काळात शिवसेनेचा ठाकरे गट वगळता तब्बल 10 ते 15 आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bacchu Kadu: शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता स्थापन केल्यानंतर राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीआज आगामी काळातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खूप मोठं विधान केले आहे.

आगामी काळात शिवसेनेचा ठाकरे गट वगळता तब्बल 10 ते 15 आमदारांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणातील आगामी हालचालींकडे लक्ष लागले आहे. (Bachchu Kadu)

काय म्हणाले बच्चू कडू

"ठाकरे गट वगळता आगामी काळात दुसऱ्या पक्षातील 10-15 आमदारांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. 20-25 आमदार जरी इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबुतीने पूर्ण काळ पूर्ण करेल”, असा दावा बच्चू कडू यांनी केले आहे. तसेच "हा पक्षप्रवेश फक्त शिंदे गटच नव्हे तर भाजपातही होऊ शकतो," असा अंदाजही व्यक्त केलाआहे.

"पक्ष प्रवेश आणि न्यायालयामुळे तारीख वर तारीख येत आहे. पुढील 15 दिवसात अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होईल”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

आदित्य ठाकरेंवरही केली टीका

आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) एकनाथ शिंदेंना दिलेल्या आव्हानावर बोलताना "आव्हान देणे हे पोचट झाल आहे.या आव्हानांना काही अर्थ नाही, हा बालिशपणा आहे जेव्हा विधानसभा निवडणूक होईल तेव्हा आव्हान दिले पाहिजे, असे म्हणत तुम्हाला एवढीच हाऊस असेल तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही लढा," अशी टीका बच्चू कडू यांनी यावेळी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

SCROLL FOR NEXT