Maharashtra Legislative Council Elections, MLA Bacchu Kadu, Amravati saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu Accident Update: अपघात की घातपात? अपघातानंतर पहिल्यांदा बच्चू कडू स्पष्टच बोलले

अपघाताचं राजकारण केलं गेलं. शहानिशा करून राजकारण करावे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

साम टिव्ही ब्युरो

>> अमर घटारे

Bacchu Kadu News: प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाल्यानंतर यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या. बच्चू कडू यांचा अपघात नाही तर घातपात आहे, याची चौकशी झाली पाहिजे अशी सुद्धा मागणी केली गेली. आता स्वत: बच्चू कडू यांनी अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

माझ्या अपघातावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या आहेत. माझा अपघातच झालेला आहे, घातपाताचा काही संबंध नाही. वाहन चालकाची चुकी नाही तर मीच गोंधळलो होतो. अपघाताचं राजकारण केलं गेलं. शहानिशा करून राजकारण करावे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

अपघातानंतर पहिल्यांदा बच्चू कडू आज औरंगाबाद येथील शिक्षक मतदारसंघाच्या प्रहारच्या उमेदवाराच्या प्रराचारासाठी जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले.

अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक येथील शिक्षक व पदवीधर निवडणुकीमध्ये आम्ही भाजपा व शिंदे गटासोबत आहोत. आम्ही ताकदीने काम करू तशी आमच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक देखील झाली आहे, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India: विराट- रोहितने आता एकच काम करावं..ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाने दिला लाखमोलाचा सल्ला

Cyber Crime : ऑनलाइन जॉबची ऑफर देत फसवणूक; तरुणाला पावणेपाच लाखांचा गंडा

Maharashtra News Live Updates: लाडक्या बहिणीच्या विरोधात लढले,काकांचा विश्वासात केला; सुषमा अंधारेंनी अजित पवारांना डिवचलं

Nana Patole : देवेंद्र फडणवीस स्वत: निवडून येणार नाहीत; अमित शहांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया

Sambhaji Raje Chhatrapati : 'छत्रपती शिवरायांचे गुरु फक्त...'; अमित शहांच्या वक्तव्यावर संभाजीराजे छत्रपती यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT