OBC leader Babanrao Taywade reveals that only 27 Kunbi certificates were issued in 40 days after the Hyderabad Gazetteer GR, countering Manoj Jaranage’s claims. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jaranage: जरांगेंचं आंदोलन ठरलं फुसका बार? तायवाडेंनी केली कुणबी प्रमाणपत्रांची पोलखोल

Only 27 Kunbi Certificates in 40 Days: मनोज जरांगेंचं आंदोलन फुसका बार ठरलंय... असा दावा करत कुणबी प्रमाणपत्रांच्या संख्येची बबनराव तायवाडेंनी पोलखोल केलीय.. तायवाडेंच्या दाव्यानुसार हैदराबाद गॅझिटेयरच्या जीआरनंतर राज्यात किती कुणबी प्रमाणपत्रं देण्यात आलेत?

Omkar Sonawane

हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणात गेल्याचा दावाच जरांगेंनी केला.. मात्र ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी जरांगेंच्या दाव्याची पोलखोल केलीय.. 2 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या 35 दिवसात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात फक्त 142 अर्ज करण्यात आलेत आणि त्यापैकी केवळ 27 कुणबी दाखले दिल्याचा दावाच तायवाडेंनी केलाय..

आता बबनराव तायवाडेंच्या दाव्यानंतर मनोज जरांगे चांगलेच संतापले आहेत.... त्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं आवाहन करतानाच सरकारलाही अल्टिमेटम दिलाय..

खरंतर मनोज जरांगेंच्या मुंबईतील उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आलं...त्यानंतर 27 प्रमाणपत्रंच वाटण्यात आल्यानं जरांगेंचं आंदोलन फुसका बार ठरलंय का? अशी चर्चा रंगलीय.. तर हा दावा भुजबळांच्या बीडमधील एल्गार मेळाव्याआधीच केलाय.. त्यामुळे तायवाडेंनी भुजबळ, जरांगेंच्या दाव्यांची पोलखोल केल्यानं पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

SCROLL FOR NEXT