Ayan Ahmed seen flaunting luxury lifestyle in viral videos amid serious allegations of exploitation. saam tv
महाराष्ट्र

नराधम अयान, त्याची अय्याशी भयाण, कुणाच्या पैशावर अयानचा माज?

Inside Ayan Ahmed’s Criminal Empire: मुलींच्या आयुष्याशी खेळणारा नराधम अयान कसा माज करायचा.. त्याचे व्हिडीओ समोर आलेत... मात्र अयान कुणाच्या जीवावर अय्याशी करतोय.. त्याचा पाठीराखा कोण? कोण पोसतंय ही विषवल्ली?

Bharat Mohalkar

मुलींना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत व्हिडीओ बनवणारा हा आहे नराधम अयान अहमद.... त्याच्या हा माज नीट पाहा.... फिरायला थार गाडी...... पैशांच्या बंडलांचा ढीग...... गाडीत पिस्तूल.... महागडे 3-4 आयफोन..... हे संतापाचा कडेलोट करणारे नराधम अयान अहमदच्या अय्याशीचे व्हिडीओ..हेच व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावून गेलेत....नेमका हाच धागा पकडून भाजपचे आमदार प्रवीण तायडेंनी अयानच्या आकाच्या चौकशीची मागणी केलीय..

या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत असताना अयान वापरत असलेली थार गाडी परतवाडामधील राजेश रोशनलाल प्रजापतीची असल्याची माहिती समोर आलीय... मात्र अयान आणि प्रजापतींचं नेमकं कनेक्शन काय? प्रजापतीनं अयानला गाडी का दिली? याचा आता पोलिसांनी शोध सुरु केलाय.. दुसरीकडे SIT अयानची चौकशी करतेय. याच चौकशीमध्ये नेमकं काय घडलं? त्याचीही माहिती सूत्रांनी दिलीय..

अयानला पश्चाताप नाहीच

पोलीस ठाणं आपल्या बापाचचआहे, अशा थाटात नराधम अयान सराईत गुन्हेगाराप्रमाणे वावरतोय...एवढँच नाही तर त्यानं केलेल्या पापाबद्दल कुठलाही पश्चाताप नसल्याचं त्यानं सांगितलंय... आपण मुलींशी कशी जवळीक साधायचो... मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढायचो... याची कबुलीच त्यानं दिलीय.. मात्र अमरावतीतील फ्लॅटवर वेगवेगळ्या मुलींसोबत जे काही झालं

आधी लाईफस्टाईलच्या माध्यमातून केलेला माज असो वा आता पोलिसांसमोरचा माज... कुठलाही पश्चाताप नाही की कुठली भीती... सराईत गुन्हेगाराप्रमाणे बिनदिक्कतपणे आपलं कुणीच काही वाकडं करु शकत नाही, अशा थाटात अयान वावरत असेल तर त्याचा पाठीराखा कोण? अयानच्या लाईफ स्टाईलला कुणाचा पैसा? आणि जेलमध्येही अयानचा एवढा माज असेल तर त्याचा आका कोण? याचा शोध घेऊन अयानसोबतच त्याच्या आकाच्याही आता मुसक्या आवळायला हव्यात....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT