Police investigation intensifies as the ‘Love Guru’ angle emerges in the Ayan Ahmed exploitation case in Amravati saam tv
महाराष्ट्र

अयानचा 'लव्ह गुरु' कोण? तरुणींच्या लैंगिक शोषणासाठी आरोपीला टिप्स

Amravati Abuse Case: अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासात नवेनवे खुलासे समोर येत आहेत. मुलींना फसवण्यासाठी आरोपी अयान अहमदला एकजण टिप्स देत होता. त्यामुळे अयानचा 'लव्ह गुरु' कोण? एसआयटी त्याला ताब्यात घेणार का?

Girish Nikam

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. आरोपी अयान अहमदनने अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केले होते. मात्र त्यानं एवढ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढलं याची खळबळजनक माहिती समोर आलीय.

मुलींशी हाय हॅलो नको...त्यांना थेट प्रश्न विचारा असा सल्ला त्याच्या लव्ह गुरूनं दिला होता. मुलींना फसवण्यासाठी त्यानं टिप्सही दिल्या होत्या. त्यानुसार मुलींना रिप्लाय देण्यास भाग पाडतील असेच प्रश्न अयान विचारायचा... 'आप वही हो ना जो वहां मिले थे?' अशा प्रकारचे प्रश्न विचारून तो मुलींना बोलण्यास भाग पाडायचा... त्यांच्याशी चॅटींग करून त्यांना प्रेमात पाडायचा...आणि मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा... अयानचा हा लव्ह गुरू कोण आहे ? पोलिस त्याला कधी ताब्यात घेणार ?

परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकऱणी SITच्या तपासात आरोपीचे अनेक कारनामे उघडकीस आलेत. आरोपी पीडितांना विविध कॅफे आणि गार्डन्समध्ये भेटल्याचं समोर आलंय.

अयानचं कॅफे कनेक्शन

- स्वतंत्र कंम्पार्टमेंट असलेल्या कॅफेमध्ये तरुणींना न्यायचा

- मुलींसोबत कॅफेमध्ये बसण्यासाठी अयान 400 रुपये द्यायचा

- सुरक्षित आणि स्वतंत्र कंम्पार्टमेंट बुक करून तरुणींसोबत अश्लील चाळे

- अमरावती, अचलपूर आणि परतवाड्यातील अनेक कॅफे पोलिसांच्या रडारवर

'द कॅफे रॉयल 10' या वादग्रस्त कॅफेमध्ये आरोपीला बरोबर घेऊन पोलिसांनी चौकशी केली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. व्हिसीद्वारे प्रकरणाचा आढावा घेतला आहे. पीडितांचे फोटो, व्हिडीओ असलेले सोशल मीडियावरील 41 अकाऊंट पोलिसांनी बंद केलेत. SIT ने 10 लोकांना चौकशी साठी ताब्यात घेतलं. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला.

आरोपी अयान अहमदच्या या दुष्कृत्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे ? हे शोधणं गरजेचं आहे. तसंच अयानचा लव्ह गुरू कोण आणि त्याला पोलीस कधी बेड्या ठोकणार हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT