Kolhapur News  Saam tv
महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापुरातील 'ही' संस्था निराधार वृद्धांना ठरतेय आशेचा किरण; जगण्याची उमेद सोडलेल्यांना मिळतेय नवी दिशा

आयुष्याच्या शेवटी एकटेपण आलेल्या वृद्ध महिलांसाठी कोल्हापुरातील अवनी संस्था एक आशेचा किरण घेऊन आलेली आहे...

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर

Kolahpur News : आयुष्याच्या शेवटी एकटेपण आलेल्या वृद्ध महिलांसाठी कोल्हापुरातील अवनी संस्था एक आशेचा किरण घेऊन आलेली आहे... अवनीच्या एकटी या संस्थेत यान त्या करणारे निराधार झालेल्या महिलांना जगण्याचा आधार मिळत आहे. (Latest Marathi News)

वृद्धप काळामध्ये घरातील मंडळींवरच ओझं झाल्यामुळे अनेक जण आपल्या जन्मदात्या आई-वडिलांनाच रस्त्यावर सोडून निघून जातात.... तर काहीजण वृद्ध असलेल्या आपल्या जन्मदात्यांनाच घरामध्ये (House) पटवून न घेतल्याने नाईलाज म्हणून घर सोडाव लागलेल्याने अनेक वृद्ध महिला रस्त्याच्या शेजारी आसरा शोधताना तुम्ही आम्ही दररोज पाहतच असतो.

कुठे जायचं ? कुठे राहायचं? काय खायचं? आणि वृद्धापकाळात रोगानं पछाडलेल्या शरीरावर औषध उपचार कसा करायचा? असे अनेक प्रश्न या लोकांसमोर असतात. या परिस्थितीला कंटाळून अनेक जण आपली जीवन यात्रा ही संपवतात... मात्र अशा परिस्थितीवरही मात करण्याची ज्यांची इच्छा असते अशांना कोल्हापुरातील अवनी संस्थेची एकटी संस्था आधारवड ठरत आहे.

एकटी संस्थेमध्ये आधार घेतलेल्या या महिलांना वेगवेगळे रोजगार उपलब्ध करून दिले जात आहेत... त्यांच्या हाताला काम मिळवून देऊन... त्यांना सन्मानानं जगण्याची एक उमेद निर्माण करून दिली जात आहे.. एकटी मध्ये आलेल्या या महिला कोणी लोकरी पासून स्वेटर रुमाल मोबाईलचे कव्हर तयार करतं तर कोणी सुंदर कागदी आणि कापडी पिशव्या तयार करत आहेत.

एकटी संस्थेमध्ये या महिलांचा दिनक्रम अतिशय सुटसुटीत करण्यात आलेला आहे. सकाळी उठल्यानंतर व्यायाम, प्रार्थना, नाष्टा आणि परिसरात ची स्वच्छता.. यानंतर दैनंदिन नेमून दिलेली काम या महिला अतिशय आनंदाने करताना आपल्याला दिसतायेत.

कामातून थोडा वेळ काढून या आपली स्वतःची करमणूक स्वतःच करताना दिसत आहेत. एखादी आजी सर्वांना पौराणिक गोष्टी सांगतात तर एखादी आजची अतिशय सुंदर भजन गाऊन सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या जगात काय सुरू आहे याचा दैनंदिन आढावा देखील दररोजच्या येणाऱ्या वर्तमानपत्रातून या महिला घेताना दिसत आहेत..

एकटी संस्थेत येण्यापूर्वी जगण्याची उमेद सोडलेल्या या महिलांना आता जगण्याची एक नवी दिशा मिळालेली आहे. या संस्थेत आल्यामुळे इतर महिलांची (Women) संगत तर लाभलीच मात्र या ठिकाणी आपण आनंदामध्ये उर्वरित आयुष्य व्यतीत करू अशी इच्छा देखील या महिलांची आहे.

मात्र एकटी संस्थेला सध्या गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींची आणि त्यांच्या आधाराची. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय अशा पद्धतीचे संस्था आपल्या समाजात काम करू शकत नाहीत. समाजातील दानशूर, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींनी जर एकटीला हातभार लावला तर अनेक निराधार महिलांच्या आयुष्यामध्ये एक नवी दिशा मिळेल यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT