Sangli Auto Race Saam Tv
महाराष्ट्र

Auto Rickshaw Race: उलट्या धावणाऱ्या रिक्षांची रेस पाहिलीय? सांगलीत रंगला अनोख्या शर्यतीचा थरार Video Viral

Sangli Auto Race: तुम्ही अनेक रेस पाहिल्या असतील. बाईक रेस, कार रेस, बैल गाड्यांची रेस, मात्र तुम्ही कधी उलट्या धावणाऱ्या रिक्षांची रेस पाहिलीय? नाही ना ही अनोखी रेस आयोजित करण्यात आली होती सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यात. नेमकी कशी होती ही उलट्या रिक्षांची रेस आणि कशा पळवल्या उलट्या रिक्षा. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Vinod Patil

चला चला चला... आई रेणुका मातेच्या दर्शनाला चला.

ओ ताई ओ माई... चला भीगी भीगी चला.

हॅलो माईक टेस्टिंग वन टू थ्री फोर. तर बंधुनो...आणि भगिनींनो रेणुकादेवी यात्रा कमिटी, वाळावा आपलं सहर्ष स्वागत करतेय.तर मंडळी मुद्दा असा की. पावसाळा संपलाय अन् सुरु झाला हिवाळा... तर मग गाठुया तात्काळ तातुका वाळवा... अहो कशाला म्हणून काय विचारता?

अहो नाना नाणी... अन् भावड्या चला चला लवकर चला... अर्र रररंर या रिक्षा उलट का पळायला लागल्या त्या... झाला वाटतं उशीर... थोडं थांबा करतो रिवाइंड. १२३...अन् स्टार्ट... तर मंडळी परत एकदा मुद्दा असा की यात्रा कमिटीने दरवर्षीप्रमाणे यंदा उलट्या रिक्षा पळण्याची स्पर्धा ठेवली..... आणि चिखल त्याला मिळणार रोख रक्कम दहा हजार रुपये.

पुंगळ्या काढलेल्या सायलेन्सर चा टेरीरी अन् फिरीरी आवाज ऐकून तुम्हाला वाटलं एखाद्या विजयी उमेदवाराची मिरवणूक आहे. पण बंड्या तसं नाही हा नाद आहे वाळव्याचा..इतर रिक्षा सरळ नाय उलटी पळती ती बी टीरीरी अन् पिरीरी आवाज करत आणि इथं फाईन नाही तर बक्षीस मिळते. ती पण रोख दहा हजार. पुंगळ्या काढलेल्या सायलेन्सर चा टेरीरी अन् फिरीरी आवाज ऐकून तुम्हाला वाटलं एखाद्या विजयी उमेदवाराची मिरवणूक आहे. पण बंड्या तसं नाही हा नाद आहे वाळव्याचा. इतर रिक्षा सरळ नाय उलटी पळती ती बी टीरीरी अन् पिरीरी आवाज करत. आणि इथं फाईन नाही तर बक्षीस मिळते ती पण रोख दहा हजार.

तर मंडळी पळणारी पळली. जिंकणारी जिंकली. हारणारी हरली पण दोस्तांनो शेवटी ही आहे एक शर्यत. कोण हारणार तर कोण जिंकणार खरं का खोटं? या शर्यतीत हाय रिस्क पण जत्रत येणाऱ्यांना आई रेणुका देवीचा आशीर्वाद मात्र फिक्स. अरं थांबा जरा एक ऐका... ही हाय जत्रा घराकडं जाऊन रिक्षा उलट्या पळवण्याचा नाद करु नका खत्रा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT