Satara, Rajwada Bus Stand, Satara Bus Accident News saam tv
महाराष्ट्र

Satara News : बस चालू ठेवून चालक चहा प्यायला गेला अन् पुढं असं जे काही घडलं...पाहा राजवाडा बस स्थानकावरील थरकाप उडवणारा व्हिडीओ

Satara Bus Accident News : पाेलिस घटनेची चाैकशी करीत आहेत.

ओंकार कदम

Satara News : सातारा शहरातील राजवाडा बस स्थानकावरील कर्नाटक राज्यातील बस उता-यास लागल्याने थेट स्थानकासमाेर रिक्षावर जाऊन आदळली. यामुळे दाेन रिक्षांचा चूराडा झाला. या घटनेत रिक्षा चालक जखमी झाला आहे. (Maharashtra News)

ही घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेली माहितीनूसार राजवाडा बस स्थानकावर कर्नाटक राज्याची बस उभी हाेती. ही बस चालू ठेऊन चालक चहा पिण्यासाठी गेले हाेते. बसचा हॅन्ड ब्रेकफेल झाल्याने बस उता-यावर लागली.

बसस्थानाकाच्या बाहेरील रिक्षा थांब्यावर नेहमीप्रमाणे रिक्षांच्या रांगा लागल्या हाेत्या. या बसने दाेन रिक्षांना धडक दिली त्यात दाेन्ही रिक्षांचा चूराडा झाला. दरम्यान बस चालकाने पळत येऊन बसमध्ये बसल्याने पुढचा अनर्थ टळला अशी माहिती नागरिकांनी दिली.

दरम्यान जमावाने दुसऱ्याच कर्नाटक गाडीच्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला मारहाण केली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सातारा पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT