औरंगाबाद हादरले! पेढा खाऊ घालून, महिलेवर बलात्कार  Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबाद हादरले! पेढा खाऊ घालून, महिलेवर बलात्कार

महिलेवरील अत्याचाराने औरंगाबाद (Aurangabad) पुन्हा एकदा हादरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अविनाश कानडजे

औरंगाबाद: महिलेवरील अत्याचाराने औरंगाबाद (Aurangabad) पुन्हा एकदा हादरले आहे. महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी तिच्यावर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे. महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (sexual assualt) केले आहे. आरोपी (Accused) एवढ्यावरच थांबले नाही, तर नग्नावस्थेतील व्हिडिओ (Video) आणि फोटो व्हायरल (Viral) करू अशी धमकी देऊन तिला वेश्या व्यवसाय करायला भाग पाडले आहे. महिलेने हिम्मत करून जवाहर नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. (Aurangabad Woman sexual assualt by eating Peda)

हे देखील पहा-

पोलिसांनी (police) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून २ आरोपींना बेड्या ठोकले आहे. तर २ आरोपी फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घटस्फोटीत असून २०११ पासून आपल्या १३ वर्षीय मुलासह एकटी राहते. २०१९ मध्ये पीडिता कार घेण्यासाठी शहरातील एका शोरूम मध्ये गेली होती. त्या ठिकाणी पीडित महिलेची ओळख आरोपी सुशील साध्ये याच्या बरोबर झाली होती. त्याने फायनान्सचे कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली पीडित महिलेकडून साडेतीन लाख रुपये कर्ज घेतले होते. यानंतर २७ मे २०१९ रोजी आरोपी सुशील साध्ये हा आपला मित्र अजय मुळे याला घेऊन तिच्या घरी गेला होता.

लोन मंजूर झाल्याचे कारण सांगून महिलेला पेढा खाऊ घातला. हा पेढा खाल्ल्यानंतर महिला बेशुद्ध झाली. पीडित महिलेला शुद्धीवर आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले, यानंतर पीडितेने आरोपीकडे दिलेले पैसे परत मागितले तेव्हा आरोपीने ५ लाखाचा चेक दिला पण तो वटला नाही. या संपूर्ण घटनेनंतर आरोपी मुळे आणि साध्ये हे २ जण पुन्हा महिलेच्या घरी गेले आणि मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ (Video) व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन महिलेवर अनेकदा बलात्कार केले आहे.

कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नसल्यामुळे त्या कारणातून आरोपी लोहार आणि रामचंद्र पाटील या अन्य दोघांनी देखील महिलेवर बलात्कार केला आहे. हे चारही आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेला एका ब्युटीपार्लरमध्ये तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकरणी महिला 4 जणांविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून २ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जागेचा वाद टोकाला! महिलेच्या झिंज्या धरत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; घटनेचा VIDEO व्हायरल

Raanjhanaa : सोनम कपूरचा 'रांझणा' पुन्हा प्रदर्शित होणार; AIनं चक्क क्लायमॅक्स बदलला, रिलीज डेट काय?

Nagpur : बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुख नागपूरमध्ये पोहचली! ढोलताशांच्या गजरात स्वागत | VIDEO

Maharashtra Live News Update: नांदणीमधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू

JioPC: टीव्हीला संगणक बनवा JioPC च्या किफायतशीर प्लॅनसह, फक्त ५९९ रुपयांत

SCROLL FOR NEXT