Election: लढवण्यासाठी बायको पाहिजे! औरंगाबादमध्ये बॅनरची जोरदार चर्चा...(पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे! औरंगाबादमध्ये बॅनरची जोरदार चर्चा...(पहा व्हिडिओ)

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: ३ अपत्ये असल्याने निवडणूक (Election) लढवता येणार नाही. यामुळे निवडणूक लढवण्याकरिता बायको (Wife) पाहिजे, अशा आशयाचे बॅनर (Banner) औरगांबादच्या (Aurangabad) गुलमंडी परिसरात लावण्यात आले आहेत. हे बॅनर रमेश पाटील नावाच्या व्यक्तीने लावले आहे. औरंगाबाद महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरची सध्या औरंगाबादमध्ये जोरदार चर्चा आहे. (Aurangabad Wife are needed to contest elections)

पहा व्हिडिओ-

मला ३ मुले असल्याने मी निवडणूक लढवण्याकरिता कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही. यामुळे निवडणूक लढवण्याकरिता बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अट नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटामधील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यामध् एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही, असे या बॅनरवर लिहिले आहे.

मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी समाजाकरिता खूप कामे केली आहेत. पण, लॉकडाऊनमध्ये (lockdown) मला तिसरे अपत्य झाले आहे. यामुळे मी निवडणूक (Election) लढवण्याकरिता अपात्र आहे. माझ्या घरातून एका व्यक्तीने निवडणूक लढवावी आणि समाजाचे प्रश्न मांडावे असे मला वाटते. यामुळे बायको मिळाली तर मी तिला निवडणुकीकरिता उभे करणार आहे. हे बॅनर लागल्यावर मला ४-५ फोन आले आहेत. पण, मी त्यांना काही देखील प्रतिक्रिया दिली नाही. २-३ दिवसात आणखी फोन येतील. सर्वांचा विचार करून जी लोकांची सेवा करेल अशा महिलेची निवड केली जाणार आहे. घरातून देखील याला विरोध नाही. आई- वडिलांशी देखील बोलणे झाले आहे. ज्या महिला इच्छूक असणार आहेत, त्यांनी यावे. त्यांचे स्वागत आहे, असे पाटील यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT