Aurangabad Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad: कोरोना नियमांचं उल्लंघन प्रशासन अलर्ट; व्यापारी मात्र आक्रमक

औरंगाबादच्या (Aurangabad) राधिका क्लॉथ सेंटरमध्ये आज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक झाली.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद : लस घेतली नसेल किंवा कोरोना नियमांचं पालन केलं जातं नसेल तर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून व्यापारी, दुकानदारावर धडक कारवाई केली जात आहे. हॉटेल, दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाच्या कारवाईला औरंगाबादच्या व्यापारी महासंघाने विरोध केला आहे. दुकाने सील करण्यापेक्षा दंडात्मक कारवाई करण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली आहे. प्रशासनाने ऐकले नाही तर जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही व्यापारी महासंघाने दिला आहे.

औरंगाबादच्या (Aurangabad) राधिका क्लॉथ सेंटरमध्ये आज औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक झाली. यावेळी बैठकीला ८४ संघटना आणि ९ तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. यापुढे कोरोना (Corona) नियम तोडणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी मात्र, दुकाने सील करू नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचा आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यावर काय भूमिका घेतात हे पाहू, अन्यथा आमची मागणी मान्य न झाल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही यावेळी व्यापारी महासंघाकडून प्रशासनाला देण्यात आला आहे. जिल्हा आणि महानगरपालिका प्रशासनाकडून पंधरवड्यात काही हॉटेल आणि कपड्यांच्या दुकानावर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आता व्यापारी आक्रमक झाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मनाई आदेश जारी

बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होणार? दसरा मेळाव्यानंतर राऊतांचा खळबळजनक दावा

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

SCROLL FOR NEXT