Aurangabad  विनोद जिरे
महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या शांतता मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली

शांतता मार्चसाठी पोलीस आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले असताना कोणीही आले नाही.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: शांतता मार्चसाठी पोलीस आयुक्त आणि पोलिस (Police) अधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले असताना कोणीही आले नाही. वंचित बहुजन आघाडीच्या या शांतता मार्च उद्देश हा शांतता भंग व्हावे, असा असल्याचे स्पष्ट झाल्याने परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राज्यभरातून औरंगाबादेत (Aurangabad) आलेले मनसेचे कार्यकर्ते आता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर दाखल होत आहेत. सभेसाठी येणार्‍या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. त्यानंतरच आत सोडण्यात येत आहे. 50 पेक्षा जास्त अधिकारी- कर्मचारी एन्ट्री पॉईंटवर आहेत. त्यात काही औरंगाबाद शहरामध्ये अनेक वर्ष काम करणारे पण सध्या इतर जिल्ह्यात आहेत. ते देखील सभेच्या ठिकाणी दाखल होत आहेत.

हे देखील पाहा-

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून (Pune) हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा. गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय (Political) वातावरण तापले होते. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. आज राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सभेची आठवडाभरापासून राज्यभर चर्चा सुरू आहे. पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याविषयी राज ठाकरे यांनी राज्य शासनाला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे त्यावर आज पुन्हा राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासोबतच हिंदुत्वाची गर्जना करत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे ही आपली ताकद दाखवणार अशी चर्चा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT