Aurangabad MNS Meeting  विनोद जिरे
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या सभेची जय्यत तयारी; मात्र पिण्याच्या पाण्याचं नियोजन शून्य

राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये मोठी सभा होणार

विनोद जिरे

औरंगाबाद: आज राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये मोठी सभा होणार आहे. यासाठी गेल्या ८ दिवसांपासून मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी सुरु आहे. परंतु, एकीकडे जय्यत तयारी सुरू असतांना दुसरीकडे मात्र, सभास्थळी पिण्याच्या पाण्याचं नियोजन शून्य पाहायला मिळत आहे. उन्हाचा (Summer) कडक पहारा सुरु असून उष्णतेने कहर केला आहे. त्यामुळे तापमान 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत येऊन ठेपलं आहे. यामुळे सभास्थळी येत असणाऱ्या कार्यकर्त्यांसह लहान मुलांच्या घशाला कोरड पाहायला मिळते आहे.

हे देखील पाहा-

दरम्यान सर्वांनाच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणाची आस लागली असली तरी घशाला ओस आहे. त्यामुळे एखाद्याला ऊन सहन नाही झाल, तर उष्माघाताचा देखील प्रकार होऊ शकतो? त्यामुळे आयोजकांनी सभास्थळी किमान पाण्याची तरी सोय करावी. असा सुर येणाऱ्या कार्यकर्त्यांमधून दबक्या आवाजात निघत आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) हे शनिवारी औरंगाबाद (Aurangabad) मध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते दाखल झाले आहेत.

या सभेसाठी मनसेचे (MNS) कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेमध्ये दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सभेची आठवडाभरापासून राज्यभर चर्चा सुरू आहे. पाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे काढण्याविषयी राज ठाकरे यांनी राज्य शासनाला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे त्यावर आज पुन्हा राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासोबतच हिंदुत्वाची गर्जना करत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे ही आपली ताकद दाखवणार अशी चर्चा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

शिंदेंच्या गुंड नगरसेवकाची डॉक्टरांना मारहाण प्रकरणानंतर राजकारण तापलं; राज ठाकरेंच्या शिलेदाराची KDMC मध्ये धडक

Tukaram Mundhe : इतर राज्यांनाही हवा महाराष्ट्रातील 'मुंढे पॅटर्न'; देशभरातील बडे अधिकारी दौरा करणार?

SCROLL FOR NEXT