Aurangabad Crime News, Aurangabad Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : कामावरुन काढल्यानं उद्योजकासह कुटुंबियांवर तलवार हल्ला करण्याचा प्रयत्न फसला; एकास अटक

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तपाडिया

Aurangabad Crime News : गाडीवर चालक म्हणून कामाला असलेल्या एकास कामावरून काढलं म्हणून त्याने चक्क मालकास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. चिडलेला कामगार तलवार घेऊन मालकाच्या घरात घुसला. परंतु औरंगाबाद (aurangabad) पाेलिसांच्या सतर्कतेमुळं उद्याेजकचा जीव वाचला. या प्रकरणी पाेलिसांनी कामगारास अटक केली आहे.

उद्योजक संजय नागरे यांनी त्यांचे वाहन चालक पाटलोबा ऊर्फ बबन बालाजी फड (राहणार आविष्कार कॉलनी, एन-6, सिडको) यास कामावरुन काढलं. त्यामुळं ताे चिडला. ताे थेट तलावर घेऊन नागरे यांच्या घरात घुसला. त्याने नागरे यांच्या कुटुंबियांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असं पाेलिसांनी सांगितलं.

दरम्यान या प्रकाराची माहिती गुन्हे शाखेला वेळीच मिळाली. त्यामुळं पाेलिसांचे एक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फड यास ताब्यात घेतलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी उद्योजक संजय नागरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात फड याच्यावर गुन्हा दाखल करुन त्यास पाेलिसांनी अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT