Aurangabad crime update saam tv
महाराष्ट्र

संतापजनक! वेडसर महिलेला मारहाण करुन बलात्कार केला, नराधम गजाआड

औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर पोलीस हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिऊर पोलीस हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका वेडसर महिलेला (Woman Sexual Assault) मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या औरंगाबाद पोलिसांनी (Police) मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या दोन तासांतच आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्रेमसिंग मन्साराम मेवाळ (culprit arrested) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या शिऊर पोलीस हद्दीत एका वेडसर महिलेला मारहाण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नराधम प्रेमसिंग मन्साराम मेवाळ याने पीडित महिलेला जबर मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान, औरंगाबाद पोलिसांनी या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेत आरोपीच्या दोन तासांतच मुसक्या आवळल्या. याप्रकरणी आरोपी विरोधात शिऊर पोलीस ठाण्यात आयपीसीच्या ३७३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Bad cholesterol: महिलांमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर ही ५ विचित्र लक्षणं दिसून येतात?

महिलांमधील 'या' 5 सवयी नवऱ्याला बिलकूल आवडत नाही

Maharashtra Politics: ठाकरेसेना अन् काँग्रेसला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह १५० पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सोडली साथ

SCROLL FOR NEXT