नवनीत तापडिया
औरंगाबाद - इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणांना जाळ्यात उडून त्यांचा नंबर मिळवला जातो आणि मग त्या मोबाईल क्रमांकावर व्हिडिओ कॉलिंग करून अश्लील चॅट करणायचा तरुणी आग्रह करू लागतात. त्यानंतर व्हिडिओ नकळतपणे रेकॉर्ड करून दुसऱ्या दिवशी तरुणांना पैशांची मागणी करत ब्लॅकमेल केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सध्या सऱ्हासपणे सुरू आहे. यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुण या सेक्सटोर्शनच्या प्रकाराला बळी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.
हे देखील पाहा -
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हाट्सअॅप हे आता मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य घटक बनत चालले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात सोशल माध्यमाच्या सहाय्याने लोक जोडली जात आहेत. मात्र यात सोशल माध्यमांचा गैरफायदा देखील काही जण घेत आहेत. इन्स्टाग्राम आणि फेसबुक या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तरुणांचा नंबर मिळवून त्यावर व्हिडिओ कॉलिंग करत अश्लील व्हिडिओ नकळतपणे रेकॉर्ड करून दुसऱ्या दिवशी तरुणांना पैशाची मागणी केली जाते. यामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले आहे.
पैसे द्या अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले जातात. सेक्सटोर्शनच्या या जाळ्यात अनेक तरुण अडकत असल्याचे समोर आले आहे. काही तरुण बदनामीच्या भीतीने सांगितल्याप्रमाणे पैसे पाठवतातही परंतु त्यानंतर पैसे मागण्याची डिमांड ही वाढतच जाते.
बदनामीच्या भीतीने अनेक तरुण अस्वस्थ देखील असतात. यामुळे काहींच्या मनात आत्महत्या सारखे विचार देखील येतात. अशा आत्महत्या होतही असतील परंतु बदनामीच्या भीतीने त्या समोर येत नाही. या सोशल मीडियाच्या गुन्हेगारांवर लवकर वचक बसविले गेले नाही, तर तरुण वयातील मुले अशीच या गुन्हेगारांकडे लक्ष होत राहतील. यामुळे सोशल मीडिया वापर करताना तरुणांनी सावधानतेने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.