Aurangabad Crime News SaamTv
महाराष्ट्र

Aurangabad News : आई-वडिलांसोबत रात्री जेवून झोपले, सकाळी उठलेच नाही; सख्या बहिणभावाचा संशयास्पद मृत्यू

औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

Aurangabad News : औरंगाबादमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. औरंगाबादेत दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादेतील सादात नगरात दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा नेमका कशाने मृत्यू झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

औरंगाबादच्या (Aurangabad) सादात नगरात दोन अल्पवयीन बहिण-भाऊ रात्री आई-वडिलांसोबत जेवण करून झोपले होते. सकाळी दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

घाटी रुग्णालयात (Hospital) बेशुद्ध अवस्थेत दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषिक केले. अदीबा असे 8 वर्षीय मुलीचे नाव तर अली असे 4 वर्षीय मुलाचे नाव आहे. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. तर कुटुंबातील दोन सदस्य गमावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

औरंगाबादेत तरुणाने प्रेम प्रकरणातून उचललं टोकाचं पाऊल

औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील जवाहर नगर परिसरात एका तरुणाने आत्महत्या केली. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

तरुणाने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र,तरुणाच्या खिशात पोलिसांना (Police) एक चिठ्ठी देखील आढळून आली आहे. त्याच्यामध्ये प्रेम प्रकरणातून या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तरुण हा औरंगाबाद येथील जवाहरनगर परिसरात राहत होता तो मुळचा बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील चोंडी येथील होता. तो केटर्सचं काम करत होता. त्याने औरंगाबादमधील राहात्या आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! बायकोचे बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध उघड; संतापलेल्या नवऱ्याकडून पोलीस स्टेशनमध्येच पत्नीची गोळ्या झाडून हत्या

India Travel : जगातील ५ सर्वात स्वस्त टूरिस्ट प्लेसेस, आयुष्यात एकदा तरी या ठिकणाला भेट द्या

Maharashtra Live News Update : जळगावात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा

Adhik Maas 2026: हिंदू नववर्ष 2083 मध्ये 12 नव्हे तर असणार 13 महिने; जाणून घ्या यागामचं धार्मिक कारण

Makar Sankranti 2026: तब्बल १९ वर्षांनंतर होणार चमत्कार; 'या' ३ राशींचं नशीब संक्रांतीला उजळणार

SCROLL FOR NEXT