Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

NCP News: राष्ट्रवादीचे जन आक्रोश आंदोलन; रामदेव बाबा, अब्दुल सत्तारांचे फोटो जाळत निषेध

राष्ट्रवादीचे जन आक्रोश आंदोलन; रामदेव बाबा, अब्दुल सत्तारांचे फोटो जाळत निषेध

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : वाढलेली महागाई, अन्‍याय, महापुरूषांवर होत असलेले बेताल वक्‍तव्‍याचा निषेध राष्‍ट्रवादीकडून (NCP) करण्यात आला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने औरंगाबादमध्ये (Aurangabad) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आले. (Maharashtra News)

देशात वाढलेली महागाई, शेतकऱ्यांवर (Farmer) होणारा अन्याय, रोजगाराचा प्रश्न, सातत्याने शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषांबाबत येणारी बेताल वक्तव्य या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रोश आंदोलन केले. आंदोलनात चुलीवर पोळी भाजून वाढत्या गॅस सिलेंडरचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदेव बाबा, सत्‍तारांच्‍या फोटोचे दहन

यावेळी महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबा तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या फोटोचे दहन करण्यात आले. तसेच राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जन्मत: दात असलेल्या कमी वजनाच्या चिमुकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

Jui Gadkari: थायलंडमध्ये मध्यरात्री हरवली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; सोलो ट्रिपमधील धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली...

Buldhana : दुर्दैवी! पोहण्याचा मोह जीवावर बेतला, पाय घसरून खोल नदीत २ मुलं बुडाली

लांब केसांसाठी दालचिनीचा घरगुती सोपा उपाय करा

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार?, भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT