Harshvardhan Jadhav support Chandrakant Khaire SAAM TV
महाराष्ट्र

Aurangabad News: चंद्रकांत खैरे-हर्षवर्धन जाधव एकत्र! लोकसभा निवडणुकीत खैरैंना पाठींबा देणार

Harshvardhan Jadhav support Chandrakant Khaire: हर्षवर्धन जाधव 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पाठींबा देणार

Chandrakant Jagtap

Aurangabad News: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैर एकत्र आल्याच्या चर्चा आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे हर्षवर्धन जाधव यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जाधव यांनी 'मी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चुकलो. पण आता नाही चुकणार नाही. मी माझे घरघुती वैयक्तिक कलह जे असतील ते बाजूला ठेऊन तालुक्याच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तटस्थ राहील, असे म्हटले आहे. (Latest Marathi News)

चंद्रकांत खैरेच निवडून येणार - जाधव

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत खैरेच निवडून येणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, इम्तियाज जलील म्हणत आहेत की, लोकसभेत तेच निवडून येतील, पण तसे नाही. आता चंद्रकांत खैरेच निवडून येतील कारण त्यांना मी पाठींबा देणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान एका कार्यक्रमात चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव कार्यक्रमात एकत्र आल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे गटही लढवणार लोकसभा?

संभाजीनगर लोकसभेची जागा शिंदे गटाच लढणार असल्याचं वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे यांनी पंढरपूर येथे केले आहे. 'लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा आजपर्यंत शिवसेना लढवत आली आहे. त्यामुळे शिंदे गटच ही जागा लढणार' असे संदिपान भुमरे म्हणाले. तसेच पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

kids Health Care: पावसात मुलांच्या तब्येतीसाठी आयुर्वेदिक पेय, आई-बाबांनी नक्कीच द्यावं

SCROLL FOR NEXT