Rutuja Shinde Aurangabad News Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! परीक्षेच्या आदल्याच दिवशी तरुणीने संपवलं जीवन; औरंगाबादेतील घटना

ऋतुजा गणेश शिंदे (वय 18) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : NEET परीक्षा एका दिवसावर आली असताना एका विद्यार्थीनीनं गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. औरंगाबाद (Aurangabad) शहरातील मुकुंदवाडी परिसरातील जयभवानी नगरमध्ये शनिवारी (16 जुलै) रात्री ही घटना (Crime) घडली. ऋतुजा गणेश शिंदे (वय 18) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. (Aurangabad Latest News)

प्राप्त माहितीनुसार, ऋतुजा शिंदे ही विद्यार्थीनी NEET परीक्षेचा अभ्यास करत होती. ऋतुजाला बारावी परीक्षेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे तिने NEET परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या परीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ऋतुजाने पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी केली.

दरम्यान परीक्षा एका दिवसावर आली असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ऋतुजाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ऋतुजाने नेमकी आत्महत्या का केली? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. (Aurangabad Todays News)

मात्र, परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचा अंदाज नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. ऋतुजा अभ्यासात प्रचंड हुशार होती. तसेच तिचा स्वभावही मनमिळावू होता. तिने असं अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी साकडं, वाढदिवसाला कार्यकर्त्यांनी केली 'लाडूतुला'

Hair Care: केस धुतल्यानंतर लवकर सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरताय? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Momos chutney recipe: स्ट्रीट स्टाईल मोमोजची चटणी घरच्या घरी कशी बनवाल?

ODI World Cup : वनडे वर्ल्डकपसंबंधी ICC ने घेतला सर्वात मोठा निर्णय; स्पर्धेचं स्वरुपच बदलणार

पुण्यातील धक्कादायक घटना! शिक्षकाचा 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचार; अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नराधमाला बेदम चोपला

SCROLL FOR NEXT