Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: म्हशीने लाथ मारल्याने मृत्‍यूचा बनाव; तपासात धक्‍कादायक वास्‍तव आले समोर

म्हशीने लाथ मारल्याने मृत्‍यूचा बनाव; तपासात धक्‍कादायक वास्‍तव आले समोर

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : ऑक्टोबर महिन्यात धोपटेश्वर परिसरातील तारा सुनील शेळके यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गोठ्यात चारा (Aurangabad News) टाकण्यासाठी गेल्यानंतर म्हशीने पोटात लाथ मारून अंगावर गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्याचे तेव्हा सांगण्यात आले. मात्र हरसुल व बेगमपुरा (Police) पोलिसांच्या तपासात तारा यांचा मृत्यूचे गुढ समोर आले आहे. (Tajya Batmya)

शहरातील जटवाडा रोडवरील होणारी नगरात एका फ्लॅटमध्येच अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याचे समोर आले. आधीच्या दोन मुली असताना केवळ मुलाच्या हव्यासापोटी तिसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या महिलेचा या ठिकाणी गर्भपात केला गेला. यानंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

डॉक्‍टरसह नर्सविरूद्ध गुन्‍हा दाखल

१२ ऑक्टोबर २०२२ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अवैध गर्भपात करणारा डॉक्टरांनी नर्स विरुद्ध आता बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. श्याम जयस्वाल व नर्स सविता थोरात असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मागील महिन्याभरात औरंगाबाद जिल्ह्यात अवैध गर्भपातामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंड्याला गर्लफ्रेंडसोबतचे कारनामे भोवणार ? पांड्याविरोधात याचिका दाखल होणार ?

दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

Maharashtra Live News Update: निलंगा बस डेपोत उभ्या असलेल्या बसने घेतला पेट

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे रमाई आवास योजनेत घोटाळा; फडणवीसांच्या नावाचं बनवलं चक्क आधार आणि रेशनकार्ड

रत्नागिरीला भूकंपाचा हादरा; घाबरून लोक घराबाहेर पळाले

SCROLL FOR NEXT