Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Aurangabad News: भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलतच संपविले जीवन; घरगुती वादाची शक्‍यता

भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलतच संपविले जीवन; घरघुती वादाची शक्‍यता

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : मावस भावाला व्हिडिओ कॉल करून २९ वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील मुकुंदवाडी (Aurangabad News) भागात शनिवारी घडली. आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. मात्र घरघुती वादातून त्याने आत्महत्या केली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Maharashtra News)

अमोल उत्तम खाडे (रा. शाहूनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अमोल हा रिक्षाचालक होता. रिक्षा चालवून तो घराचा उदरनिर्वाह करायचा. अमोलचे साडेतीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्याला अडीच वर्षाची एक मुलगी आहे. पत्नी गेल्या अनेक महिन्यांपासून माहेरी गेली असल्याने तो एकटाच भाड्याच्‍या घरात राहत होता. शनिवारी संध्याकाळी अमोलने ज्योतीनगर भागात राहणाऱ्या मावस भावाला व्हिडिओ कॉल करत आत्महत्या करीत असल्याचे सांगितले.

नातलग पोहचले पण..

व्हिडिओ कॉलमध्ये अमोल किचन ओट्या जवळून बोलत होता. त्याने गळ्यात नायलॉनची दोर होती. मावस भावाने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्‍हता. नातलगांनी तातडीने अमोल राहत असलेल्या घराकडे धाव घेतली असता त्याने गळफास घेतल्या दिसले. त्याला तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपला सत्तेचा माज आलाय, हा व्हायरस तुम्ही पसरू देताय; राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना रोखठोक पत्र

India Terror List: पाकिस्तानातील 23 दहशतवाद्यांवर भारताची सर्वात कारवाई, गृह मंत्रालयाच्या निर्णयाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: बदलापुरात जोरदार पावसामुळे कात्रप भागातील रस्ता पाण्याखाली

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल; मेसेज वाचून अंगावर येईल काटा

HSRP Number Plate: महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट नाही? आजपासून थेट ₹1,000 दंड; सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT