Sharad pawar, Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

सुप्रियाताईंना २ मुख्यमंत्र्यांची सवय, रिमोट काढून घेतल्याने नाराजी; मुख्यमंत्र्यांचे पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र

बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती? याचे उत्तर आजच्या गर्दीने दिले आहे - शिंदे

Jagdish Patil

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी पैठणमध्ये मुख्यमंत्र्याची जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसह पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.

सभेत बोलताना शिंदे म्हणाले, 'आपण एकदा दिलेला शब्द बदलत नाही. याबाबतीत मी स्वत:चं देखील ऐकत नाही. बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती? याचे उत्तर आजच्या गर्दीने दिले आहे. जबरदस्तीने पैसे देऊन जमा झालेली ही गर्दी नाही, प्रेमाने आलेली गर्दी आहे.

संदिपान भुमरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्याची ही गर्दी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. बाळासाहेबांच्या विचाराला पसंती देणाऱ्यांची गर्दी असल्याचं म्हणत त्यांनी आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला.

पाहा व्हिडीओ -

तर यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं, मुख्यमंत्री म्हणाले, ' ताई म्हणातात, अजित दादा सकाळी ६ ला उठून काम करायचे. आधी दादा टीका करायचे आता ताई पण सुरु झाल्या आहेत. टीका करणं विरोधकांचे काम आहे. टीका करणं हा त्यांचा धंदा आहे.

अजित पवार ६ ला उठून काम करतात तर हा एकनाथ शिंदे सकाळी ६ पर्यंत करतो आणि ते मी सदैव करत राहणार. शिवाय ताईं २ मुख्यमंत्री हव्या आहेत म्हणाल्या, त्यांना पुर्वीची सवय आहे. त्यावेळी दोन मुख्यमंत्री होते. त्यांचा रिमोट कंट्रोल काढून घेतला आहे. त्यामुळे त्या नाराज असल्याचा टोला त्यांनी सुळेंना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT