औरंगाबादमध्ये बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना! SaamTv News
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये बहिण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना!

भावाने बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि सोन्याचे दागिने लुटले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना औरंगाबादमध्ये (Aurangabad) समोर आली आहे. भावानेच बहिणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (Rape) करून दागिने लुटल्याची तक्रार महिलेने पोलिसांत दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे मावस बहीण भाऊ आहेत. फिर्यादी महिलेचा काही दिवसाच्या अगोदर घटस्फोट झाला होता.

हे देखील पहा :

या खचलेल्या महिलेला आरोपी महिलेचा मावसभाऊ याने तुझ्याशी लग्न करेन, आयुष्यभर तुझ्या मुलीचा सांभाळ करेल, असे सांगून लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या आई-वडिलांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीचे आणि फिर्यादीच्या आईचे दागिने (Jewellary) वेळोवेळी मोडून 5 लाख रुपये घेऊन जुलै 2021 ते डिसेंबर 2021 या काळात त्याच्या भोईवाडा येथील रूमवर तसेच समर्थ नगर येथील एका हॉटेलमध्ये (Hotel) नेवून फिर्यादी सोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यानच्या काळात ऑक्टोंबर 2021 मध्ये फिर्यादीस गर्भधारणा झाली.

त्यावेळेस आरोपीने लग्न होईपर्यंत गर्भधारणा (Pregnant) करू नकोस म्हणून गोळ्या घेऊन गर्भपात केला. त्यानंतर तू जर हे कोणाला सांगितले तर तुझ्या मुलीला जीवे मारेल आणि तुझ्या सोबत लग्न करणार नाही. अशी धमकी देऊन लग्नास टाळाटाळ केली. फिर्यादी महिलेला आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT