Aurangabad News Saam tv
महाराष्ट्र

Crime: मोत्यांच्या शेतीचे आमिष दाखवून 25 कोटींत गंडवले

मोत्यांच्या शेतीचे आमिष दाखवून 25 कोटींत गंडवले

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : शिंपले संवर्धन, मोत्यांची शेती करण्याचे आमिष दाखवून औरंगाबादेतील लाडसावंगी परिसरातील (Farmer) शेतकऱ्यांची 25 कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking News Marathi)

इंडो पर्ल कंपनीचा मालक अरुण अंभोरे याने शिंपल्याच्या बीज संवर्धनासाठी लाडसावंगी, पिंप्रीराजा, सय्यदपूर, जयपूर, चारठा, सेलूद, हातमाळी, पिंपळखुटा आदी (Aurangabad) गावांतील शेतकऱ्यांसोबत 13 महिन्यांचा करार केला. तेरा महिन्यांनंतर त्याने शेतातून शिंपले मोजून घेतले. मृत शिंपल्यांची रक्कम वगळून प्रति जिवंत शिंपल्याला 180 रुपये देण्याचे मान्य केले.

धनादेश वटलेच नाही

शिंपले नेताना धनादेशावर रक्कम टाकली. शेतकऱ्यांनी धनादेश बँकेत जमा केल्यानंतर ते वटले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीचे कार्यालय गाठले तेव्हा कुलूप होते. यानंतर शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्याकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भरगर्दीत तरुणीनं हात पकडून ओढलं अन्...; हॉटेलमध्ये जाताना अभिषेक शर्मासोबत घडला धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: - TCS कंपनी महाराष्ट्रात नव्हे अख्या भारतासह जगभरात - छगन भुजबळ

Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट! कोणत्या जिल्ह्यांत किती आहे तापमान? जाणून घ्या

Gas Burner Cleaning: गॅस बर्नरवरचे काळे डाग 5 मिनिटांत गायब! ही सोपी ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Mumbai Crime: साडीची डिलिव्हरी करायला आला, पैसे देताना मुलीला दाखवला अश्लील व्हिडीओ; मुंबईतील संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT